Last Updated on 20 Aug 2025 7:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जून 2025 मध्ये इंग्रजी 30 व 40 श.प्र.मि. विषयाची परीक्षा दिनांक 18 ते 24 जून 2025 या कालावधीत आणि मराठी व हिंदी 30 व 40 श.प्र.मि. विषयाची परीक्षा दिनांक 30 जून ते दि. 4 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. परीक्षेचा निकाल दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट घेता येईल.
निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसात परीक्षार्थींनी गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रुपये 100/- प्रमाणे व छायाप्रती मिळण्यासाठी प्रति विषय रुपये 400/- रक्कम ऑनलाईन पध्दतीने दिनांक 29 ऑगस्ट 2025 पर्यंत भरण्यात यावेत.गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुर्न-मुल्यांकनासाठी प्रती विषय रु.600/- प्रमाणे ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, याबाबतच्या सविस्तर सुचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.












































































