Last Updated on 02 Mar 2022 9:54 AM by Sanjay Patil/Adhorekhit
अवैध व्यवसाय करणार्या टोळक्याबरोबर खाकी वर्दीही अर्थिकदृष्ट्या गब्बर : भाजपाचा पत्रकार बैठकीत गंभीर आरोप
सांगली ।
राज्य सरकारासह खाकी वर्दीची पुर्णतः नाचक्की व बदनामी झाली.खाकीवर्दीतील भ्रष्टाचार जनतेसमोर आला.अशा वसुलीत वाळवा व शिराळा तालुक्यातील पोलिसही मागे नाहीत.त्यांचे गैरकाभाराचे काही व्हिडीओ उपलब्ध असुन योग्यवेळी भाजपाच्यावतीने न्यायालयात सादर केले जाणार आहेत.दोन्ही तालुक्याचा क्राईम रेट हा वाढत चालला असुन अवैद्य व्यवसाय करणार्या टोळक्याबरोबर खाकी वर्दी ही अर्थिकदृष्ट्या गब्बर बनत चालली आहे. आज दोन्ही तालुक्यातही मटका,दारू,तिनपाणी,सावकारी,व्हिडिओ गेम,लॉजिंग या अवैध व्यवसायासह अनेक अवैध व्यवसाय खाकी वर्दीच्या कृपाअशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत.हे अवैध व्यवसाय दि.१५ मार्चपर्यंत बंद झाले नाहीत तर वाळवा तालुका भाजपाच्या वतीने बंद केले जातील,असा इशारा वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी पत्रकार परीषदेत दिला.
तर भाजपा पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत मटक्याच्या चिट्टया समोर टाकत अवैध व्यवसाय चालकांच्याकडुन खाकी वर्दीतील हप्ते वसुली करणार्या पंटरची यादी नावासह उपलब्ध असुन ती योग्य वेळी योग्य ठिकाणी जाहीर करू असा इशारा दिला.
वाळवा व शिराळा तालुक्यात पोलिसांच्या कृपाआशिर्वादाने सुरू असलेल्या अवैध व्यवसायाचा पोलखोल करण्यासाठी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे(भैय्या) यांनी पत्रकार परिषद आयोजीत केली होती.
यावेळी वाळवा तालुका ओ.बी.सी. सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले,वाळवा तालुका भाजपा महिला अघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष निवास पाटील,भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार,इस्लामपुर शहर भाजपा अध्यक्ष अशोकराव खोत,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात,भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस प्रविण परिट,अक्षय कोळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना धैर्यशील मोरे म्हणाले,वाळवा व शिराळा तालुक्यात दारू, शिंदी, मटका, मुरूम, वाळु वाहतुक,व्हिडिओ गेम,ऑनलाईन लाॅटरी सेेंटर,वडाप,लॉज,बिअर बार,खाजगी सावकारी यासह अनेक अवैद्य व्यवसाय पोलिसांच्या कृपाआशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत. ट्रॉफिक पॉईंट ठिकाणी तर अक्षरक्ष: प्रवाशांना वाटमारीसारखे लुटले जात आहे. क्राईम रेट वाढत असताना अनेक एजंटांच्या मार्फत चिरिमिरी घेवुन काही प्रकरणे बाहेरच्या बाहेर मिटवली जात आहेत. इस्लामपुर शहरात मोबाईल चोरी, घरफोडी, वाहन चोरी चे प्रमाण वाढले आहे. या चोरांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना पुर्णतः अपयश आले असुन चोरांना पोलिस सामिल आहेत काय? असा प्रश्न नागरिकांच्यामध्ये निर्माण झाला आहे. शहरातील बाजारपेठेतुन मोबाईल चोरीचे प्रमाण आजही तसेच आहे. घरफोडीमुळे जनतेमध्ये भिती निर्माण झाली आहे. शहरातील कॉलेज विद्यार्थिंनीच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. आजची तरूण पिढी नशेच्या आहारी चालली असुन त्यांना उपलब्ध होणारे नशेचे साहित्य सहजरित्या शहरात उपलब्ध होत आहे. अनेक नागरिकांच्या फसवणुकीच्या तक्रारी सहा-सहा महिने घेतल्या जात नाहीत. ज्याची फसवणुक झाली त्यालाच पोलिसांच्याकडुन तक्रार देवु नको म्हणुन दमदाटी केली जाते.खिसे कापणार्यांना सवलत व ज्याचे खिसे कापले त्यांनाच दमदाटी हा अनुभव नागरीकांना येत आहे,
वाळवा व शिराळा तालुक्यात अवैध मार्गाने रात्रीच्या वेळी वाळु वाहतुक, मुरूम वाहतुक केली जाते. दारू, शिंदी, नशेच्या गोळया राजरोसपणे विकल्या जातात. मटका, व्हिडिओ गेम, ऑनलाईन लॉटरी सेंटर, वडाप,अलीकडील फोफावलेली खाजगी सावकरी हे अवैद्य व्यवसाय दिवसा ढवळया पोलिसांच्या कृपाआशिर्वादाने सुरू आहेत. यातुन खाकी वर्दीतील पंटर आपला वरचा साहेब खुश करण्यासाठी मोठया प्रमाणात अर्थिक वसुली करीत आहे. आमच्याकडे अवैद्य व्यवसाय करणार्या लोकांच्यानावासह वसुली करणार्या खाकीवर्दीतील पंटरच्या नावाची यादी आहे. कोणाला कोणाकडुन किती अर्थिक हप्ता आहे, कोणत्या साहेबाला महिन्याला किती हप्ता आहे. याची पुर्णतः माहिती आहे.याचे काही व्हिडीओ ही उपलब्द आहेत. फाळकुटदादा तर गल्लो गल्ली झाल्याने गोरगरीब व छोट्या मोठ्या व्यापारांना त्रास देत आहेत. खाजगी सावकारीला कंटाळुन अनेकांच्यावर गाव सोडण्याची वेळ आली आहे. शेतकर्यांच्या जमिनीचे वादही पोलिसांच्या पर्यंत पोहचत असले तरी ज्या शेतकर्यांचा खिसा गरम त्याला न्याय व ज्याचा खिसा रिकामा त्याच्यावर अन्याय हे धोरण आमच्या शेतकरी बांधवांच्या बद्दल पोलिसांचे आहे. ही परिस्थिती चिड आणणारी आहे, यामध्ये पोलिसांनी अवैद्य व्यवसायीकांच्या हातात हात घालुन आपले खिसे भरले आहेत. हे सर्व व्यवसाय दि.१५ मार्च पर्यंत बंद झाले नाहीत तर प्रसार माध्यमांना बरोबर घेवुन हे सर्व अवैध व्यवसाय भाजपा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बंद करतील असा इशारा शेवटी भाजपा पदाधिकार्यांनी दिला.
पालकमंत्री जयंत पाटील यांचा वाढता हस्तक्षेप
राज्यातील सत्तांतर झाल्यापासुन पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हयातील सर्व सरकारी यंत्रणेवर दबाव आणुन विरोधकांना लक्ष केले आहे. संपुर्ण सांगली जिल्हयात पोलिस खात्याने तर आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधकांना लक्ष करण्याची सुपारी घेतली आहे. विरोधकांच्यावर गुन्हे दाखल करणे, विरोधकांना पोलिसांच्या माध्यमातुन वेगवेगळया गुन्हयात अडकवणे असे सर्रास सुरू आहे. काही दिवसापुर्वी इस्लामपुर शहरात एक गुन्हा घडला. या गुन्हयातील अरोपींना अटक करण्यात आली. व त्यांना या गुन्हयातुन वाचवितो, तु राष्ट्रवादी पक्षात प्रवेश कर असे चक्क पोलिस अधिकार्याने धमकावले तर एका प्रतिष्ठीत व्यक्तीने पोलिस अधिकार्याला आमच्या घरी जेवायला या असे निमंत्रण दिले तर तुम्ही राष्ट्रवादी विरोधी भाषणं करता त्यामुळे मी येऊ शकत नाही असे उत्तर दिले. याच बरोबर शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी पोलिस अधिकार्यांच्या दालनात बसुन अनेक गुन्हयात हस्तक्षेप करत आहेत. ही राजकीय पक्षाशी निगडीत लोक किती वेळ पोलिस स्टेशनमध्ये बसुन असतात हे सी.सी.टि.व्ही. फुटेज पाहिले कि लक्षात येईल. हा सर्रास पालकमंत्री जयंत पाटील यांचा पोलिस ठाण्यामध्ये सुरू असलेला हस्तक्षेप हा जनतेला चिड आणणारा आहे. यापुढे पोलिसांनी आपण जनतेचे सेवक आहोत, कोणत्याही एका पक्षाचे सेवक नाही, आपल्या खाकी वरील निष्ठा व रास्त कर्तव्य करुन समाजातील घटकांना योग्य न्याय द्यावा.अन्यथा पुराव्यासह वरिष्ठ अधिकार्यांच्याकडे तक्रार करून पोलिस अधिकार्यांची निलंबनाची मागणी केली जाईल.पोलिसांच्या अनेक गैरकारभाराचे पुरावे असलेले व्हिडीओ उपलब्द आहेत,ते योग्य वेळी जनतेसमोर दाखविले जातील असा ही इशाराही उपस्थित पदाधिकार्यांनी दिला.






































































