Last Updated on 12 Mar 2025 2:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
लाडक्या बहिणींचा आलेख उंचावला!
मुंबई : ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी २ कोटी ३३ लाख ३३ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला, ही संख्या आता २ कोटी ४७ लाख झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. तसंच या योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपये मदत देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं.
आमदार रोहित पवार, वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. नमो सन्मान योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
मात्र अशा महिलांना एक हजार रुपये नमो सन्मान योजनेतून आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातील असं त्या म्हणाल्या. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रश्न विचारण्याची परवानगी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मागितली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळून लावत पुढचं कामकाज सुरू केलं. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेला सर्व महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी, म्हणजेच ऑक्टोबर २०२४ मध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे २ कोटी ३३ लाख ६४ हजार इतकी होती. विधानसभा निवडणुकीनंतर, म्हणजेच फेब्रुवारी २०२५ मध्ये या लाभार्थ्यांची संख्या सुमारे २ कोटी ४७ लाख झाली आहे. म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येत निवडणुकीनंतर जवळपास १४ लाखांची वाढ झाली आहे.
माझ्या लाडक्या बहिणींचा हा प्रतिसाद “निवडणुकीनंतर योजना बंद पडणार, निवडणुकीनंतर लाभार्थ्यांची संख्या कमी होणार” या विरोधकांच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देणारा आहे!
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 31 Aug 2026 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit नियमावलीचे पालन करणे बंधनकारक सांगली | सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) अशा तत्सम आस्थापनांना जिल्हाद... Read more













































































