Last Updated on 04 Nov 2024 8:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई (वृत्तसंस्था) । राज्यात महाविकास आघाडीच्या १८० जागा येतील असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयांचा महाविकास आघाडीला फायदा होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
राज्यात महाविकास आघाडीकडे उमेदवारांची संख्या जास्त राहिल्याने कमी जास्त प्रमाणात नाराजी होती. मात्र सर्व वाद मिटवून बंडाना थंड करुन आम्ही पुढे जात आहोत. राज्यातील महायूतीचे भ्रष्ट् सरकार घालवण्याचा प्रमुख हेतू आमच्यापुढे असल्याने आम्ही समन्वयाने पुढे जात असल्याचे देखील यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयांचा महाविकास आघाडीला फायदा होईल. काही स्वायत्त संस्था असतात मात्र दुर्दैवाने त्यांचा वापर २०१४ पासून राजकारणासाठी होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्लांबाबत जो निर्णय घेतला असेल तर निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला आहे. किरीट सोमय्यांना आयएनएस विक्रांत प्रकरणात मिळालेली क्लिनचीट समजून घ्यावी लागेल. कारण भाजपात असलं म्हणजे क्लीनचिट निश्चित मिळते. नंदुरबार जिल्हा काँग्रेसला माननारा जिल्हा आहे. या जिल्हात काँग्रेसला मानणारे कार्यकर्ते असून या ठिकाणी काँग्रेसमधील नाराजी दूर करुन आम्ही पुढे जात आहोत. जिल्ह्यात मोठं यश मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब थोरात यांनी शहादा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुहास नाईक यांची समजूत काढली असून सुहास नाईक यांनी माघार घेणार घेतली आहे.











































































