Last Updated on 24 Nov 2023 7:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ऊसदरात 50 – 100 रुपयांवर तडजोड करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे मोठे पाप केले आहे.गुरुवारीआंदोलन करून स्वतःच्याच अंगावर गुलाल उधळून घेतला आहे,अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रेठरेधरण (ता. वाळवा) येथे बोलताना स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्यावर केली.शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल 3 हजार 300 रुपये मिळाली असती.मात्र, शेतकरी नेत्याने कारखानदारांशी सेटलमेंट केली असल्याचा आरोप त्यांनी केला
खोत म्हणाले की, गुरुवारी शेतकरी नेत्यांने आंदोलन केले.त्यांनी स्वतःच्या अंगावर गुलाल उधळून घेतला.ते सांगत आहेत की,शेतकऱ्यांना 50 ते 100 जादा मिळवून दिले.कारखानदारांनी पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हे पैसे मिळणार आहेत.
ते म्हणाले, 50 आणि 100 रुपये हे कारखानदारांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून तो मंजूर झाल्यावर हे पैसे मिळतील.म्हणजेच आज रोख, उद्या उधार असला व्यवहार त्यांनी केला.त्यांनी शेतकऱ्यांची खऱ्याअर्थाने फसवणूक केली आहे.
ते म्हणाले, कमी पाऊस व उसाचे क्षेत्र घटल्याने साखरेचे भाव वाढणार आहेत.यावर्षी प्रतिटन 3 हजार 300 रुपये पर्यंत पहिली उचल मिळाली असती.शेट्टी यांनी कारखानदारांशी सेटलमेंट करून शेतकऱ्यांना चांगल्या दरापासून वंचित ठेवले आहे.त्यांनी व कारखानदारांनी शेतकऱ्यांविरोधात कट करून मोठे पाप केले आहे.
पहिला हप्ता 3100 – 3 200 मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी रस्तावर उतरू.त्या शेतकरी नेत्याचा व कारखानदारांचा कट उधळून लावू, असा इशारा खोत यांनी यावेळी दिला.






































































