Last Updated on 29 Jan 2025 7:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
निशिकांतदादा सुवर्ण चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा २०२५
इस्लामपूर : उरुण येथील पोलीस क्रिडांगणावर दि हॉकी सांगली असोसिएशन व हॉकी महाराष्ट्र असोसिएशन यांच्यावतीने निशिकांत दादा सुवर्ण चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये आजच्या झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत यजमान निशिकांत दादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, मुंबई ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब, सातारा डिस्ट्रिक्ट असोसिएशन फलटण व महाराष्ट्र क्रिडा मंडळ यांनी आपापल्या प्रतिस्पर्धेकांवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
गुरुवार दिनांक ३० रोजी सकाळी या स्पर्धेतील दोन उपांत्य सामने खेळविण्यात येणार असून अंतिम सामना दुपारी ४ वाजता होणार आहे. व त्यानंतर या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे.
आजचा सकाळचा पहिला उपांत्यपूर्व सामना यजमान निशिकांत दादा स्पोर्ट्स फाऊंडेशन वि. एस. आर. पी. एफ यांच्यात होऊन हा सामना यजमान निशिकांत दादा स्पोर्ट्स फाऊंडेशन ने ४-१ गोलनी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.सामन्याच्या पूर्वाधार्त ६ व्या मिनिटास एस.आर.पी.एफ च्या कुशल यादव ने मैदानी गोल केला. त्यानंतर १५ व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्ट्री कॉर्नरवर निशिकांत संघाच्या मल्हारी चव्हाण याने गोलची परतफेड करत सामन्यात १-१ गोलची बरोबरी आणली. सामन्याच्या उत्तरार्धात निशिकांत स्पोर्ट्स च्या विध्यासागर पाटील ने पेनल्ट्री कॉर्नरवर दुसरा गोल केला. त्यानंतर ४९ व्या मिनिटास सुशिल पवार ने तिसरा अप्रतिम मैदानी गोल करत तीन गोलची आघाडी घेतली. ५६ व्या मिनिटास निशिकांत स्पोर्ट्स च्या उदयराज पाटील ने चौथा गोल करत संघास उपांत्यफेरी गाठून दिली. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून निशिकांत स्पोर्ट्स संघाच्या सुशिल पवार याला गौरविण्यात आले.
सकाळच्या सत्रातील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई पोर्ट ऑथॉरिटी क्लब संघाने खालसा युथ क्लब नांदेड संघाचा ३-० गोलनी पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या पूर्वार्धात १९ व्या मिनिटास पोर्ट क्लबच्या रोमेश पिल्ले याने तर ३० व्या मिनिटास पोर्टच्या स्टीफन स्वामी ने गोल करत संघास दोन गोलची आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात मुंबई पोर्ट संघाचा कर्णधार अथर्व कांबळे याने गोल करत संघास विजय मिळवून दिला.
या सामन्यासाठी उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुंबई पोर्टच्या रोमेश पिल्ले ला गौरविण्यात आले.

दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात सातारा डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन फलटण संघाने छावा मित्र मंडळ कोल्हापूर संघाचा १-० गोलनी पराभव केला. सामन्याच्या पूर्वाधार्त ३ मिनिटास सातारा संघाला पेनल्ट्री कॉर्नर मिळाला यावर अनिकेत अडागळे याने गोल करत संघास एक गोलची आघाडी मिळवून दिली. उत्तराधार्त छावा संघाकडून गोलची परतफेड करण्यासाठी प्रयत्न सुरु होते परंतु, सामन्याच्या निर्धारीत वेळेत त्यांना एकही गोल करता आला नसल्याने हा सामना सातारा डिस्ट्रिक्ट संघाने १-० गोलनी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यासाठी उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल सातारा संघाचा खेळाडू अनिकेत अडागळे याला गौरविण्यात आले.
दुपारच्या सत्रातील शेवटचा सामना महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर वि. एस आर पी एफ कोल्हापूर यांच्यात अटीतटीचा होऊन हा सामना १-० गोलनी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.सामन्याच्या पूर्वर्धात दोन्ही संघाकडून गोलसाठी आक्रमक प्रयत्न केले गेले परंतु, दोन्ही संघाला एक ही गोल करता आला नाही. उत्तरार्धात मात्र ४४ व्या मिनिटास महाराष्ट्र कोल्हापूर संघाच्या पृथ्वीराज खोत यांनी मैदानी गोल करत सामन्यात एक गोलची आघाडी घेतली. त्यानंतर ५७ व्या मिनिटास महाराष्ट्र कोल्हापूरच्या संकेत पाटील ने गोल करत हा सामना महाराष्ट्र संघास जिंकून दिला. या सामन्यात एस आर पी एफ कोल्हापूर चा गोलकीपर रोशन पाटील ने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्र च्या संकेत पाटील ला गौरविण्यात आले , सदर स्पर्धेसाठी मंहेश खुंटाळे सर सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी व हॉकी प्रशिक्षक, उदय पवार सर सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी व हॉकी प्रशिक्षक, शिवाजी डुबल सर हॉकी प्रशिक्षण,राजेंद्र कदम दादा क्रीडाप्रेमी, सनी खराडे शहर प्रमुख मनसे, दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी युवराज निकम सर , दैनिक पुढारीचे प्रा.अशोक शिंदे सर, मारुती पाटील सर , सुनील माने सर,दै.लोकमंथनचे सतीश कुंभार सर, मोरया ज्वेलर्सचे मालक सागर निकम, युवा नेते प्रदीप थोरात,मनोज पवार , युवा नेते अक्षय पाटील भैय्या ,संजय बिंदगे साहेब,सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे साहेब, एम जी पाटील तात्या,पुनदी गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील ,उरुणवाडी चे युवा नेते रोहित यादव,अमृत पाटील जयदीप निकम सर हे मान्यवर उपस्थित राहिले
स्पर्धेत पंचप्रमुख दिग्विजय नाईक, पंच म्हणून राहुल गावडे, मनोज कोरे, करन सिंग, कुणाल साधवानी, कौशिक साधवानी, प्रशांत निवळे, सोमनाथ कांबळे, ओंकार भांडवले, टेक्निकल पंच म्हणून विजय जाधव, अभिजित पाटील, विजय पाटील, समीर शेख हे काम पाहत आहेत.
गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी होणारे उपांत्य सामने :
सातारा डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन फलटण वि महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर
(सकाळी ८ वा.)
यजमान निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन वि.मुंबई ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब
(सकाळी ०९:३० वा.)
अंतिम सामना
दुपारी ४ वा.












































































