Last Updated on 13 Nov 2024 4:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
धुळे। मी संपुर्ण महाराष्ट्रात फिरुन आलो आहे आणि येत्या २३ तारखेला महाआघाडीचा सुफडा साफ होणार आणि महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सरकार बनणार आहे. देशभरातील १४० कोटी जनता मोदींच्या सोबत आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसुध्दा कमळाच्या आणि महायुतीच्या सोबत आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती आणि भाजपाचा प्रचंड विजय निश्चित आहे. असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथे जाहिर सभेत केले.
शिंदखेडा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शहा यांची आज दोंडाईचा येथील रावल स्टेडियममध्ये भव्य सभा झाली. या सभेत अमित शहा यांनी काँगेससह महाविकास आघाडीवर तसेच उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. आमदार जयकुमार रावल यांनी शिंदेखडा विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती देत पुन्हा एकदा त्यांना विजयी करण्याचे आवाहन शहा यांनी यावेळी केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आणि महाविकासआघाडीने महाराष्ट्रात उलट सुलट घोषणा करुन काही आश्वासने दिली आहेत. हरियाणात सुध्दा अशाच प्रकारचे उलट सुलट घोषणा करुन लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला होता पण हरियाणात काँग्रेसचा सुफडा साफ झाला. झारखंडमध्ये सुध्दा भाजपाच विजयी होत आहे. महायुतीचे सरकार बनले की प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात २१०० रुपये जमा होणार आहे. असे आश्वासन अमित शहा यांनी दिले. आघाडीवाल्यांनी संत रामगिरी महाराज यांच्या विरुध्द वक्तव्य दिले. शिंदखेडा दोंडाईचा मध्येही दंगे घडवले. उध्दव ठाकरे सुध्दा हिंदूंना अतिरेकी म्हणणार्यांच्या सोबत जावून बसले आहेत. महायुतीचा गट हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयकार करणारा त्यांच्या आदर्शाचे पालन करणारा गट आहे. कॉंग्रेस एससी, एसटी विशेष करुन मागासवर्गीयांची विरोधी पार्टी आहे. मोदींनी गरीब घरातल्या आदीवासी महिलेला राष्ट्रपती बनवले.
म्हणाले पुढे म्हणाले, मोदींच्या मंत्रीमंडळात २७ टक्के मंत्री हे मागास, दलित, आदीवासी ओबीसी प्रवर्गाचे घेतले आहेत. प्रत्येक ठिकाणी ओबीसीचे २७ टक्के आरक्षण देण्याचे काम मोदींनी केले आहे. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ. मुस्लिमांना आरक्षण कुठून देणार मागासवर्ग ओबीसींचे आणि दलितांचे आरक्षण हिसकावून ते मुस्लिमांना आरक्षण देवू इच्छितात मात्र राहुल बाबा तुमची चौथी पिढी येईल पण मुस्लिम आरक्षण देवू शकणार नाही. यांनी पुर्ण जिवन मुस्लिम तुष्टीकरण करण्याचे काम केले असे अमित शहा म्हणाले .
यावेळी सरकारसाहेब रावल, नगराध्यक्ष नयनकुंवर जी, सुभद्रादेवी रावल जी, आमदार अमरिश पटेल, भाजपाचे संघटन महामंत्री विजय चौधरी, मा.खा. सुभाष भामरे, भाजपा जेष्ठ नेते राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, सुभाष देवरे, आमदार जयकुमार रावल, धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भदाणे, साक्रीच्या उमेदवार मंजुळाताई गावीत हे उपस्थित होते.










































































