Last Updated on 16 Nov 2023 9:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
प्रति सरकार स्थापन करण्याची धमक असलेल्या भुमीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा…..!
![]()
ब्रिटिशांच्या गुलामी विरोधात देशात बंडाचा वणवा पेटला होता.अशा परिस्थितीत ब्रिटिश सरकारला थेट आव्हान देण्याचे काम क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले.ते म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रतिसरकारची स्थापना करून.9 ऑगस्ट 1942 मध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रति सरकारची मुहूर्तमेढ रोवली.ज्याला “पत्री सरकार” म्हणूनही ओळखले जाऊ लागले.भूमीगत चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारसमोर प्रति सरकारने मोठे आव्हान उभे केले होते.यातून खूप मोठी क्रांती झाली होती उरूण इस्लामपूर हे नेहमी केंद्रबिंदू होते आणि असणार कारण जातीभेदाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहण्याचा एकोपा जगण्याची परंपरा कायम आहे….!
प्रश्न फक्त मराठा समाजाचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे,आज जर आपण सर्वांनीच एकत्र येवून लढा दिला तर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या शिवाय राहणार नाही…!

इस्लामपूर : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उद्या जाहीर सभा होत आहे. 17 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता जयंत पाटील खुले नाट्यगृह येथे लाखोंच्या संख्येने यायचे आहे.उरूण इस्लामपूच्या इतिहासात येवढी गर्दी कधीच झाली नाही एवढी विराट,प्रचंड गर्दी हे ध्येय ठेवुन यायचे आहे.सखल मराठा समाज नियोजनात तळ ठोकून आहेत त्यांना आपण मदत करायची आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि तुमच्या सर्वांच्या पायाची धूळ माझ्या कपाळी लावायची आहे, ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार व्हायचे आहे…!
एक मराठा लाख मराठा
![]()











































































