Last Updated on 12 Dec 2021 6:19 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कुंडलीत गुरु ग्रहा (बृहस्पती) शी संबंधित दोष असेल तर गुरुवारी विशेष पूजा करून या दोषाची शांती केली जाऊ शकते.बृहस्पती देवतांचे गुरूसुद्धा आहेत.गुरु वैवाहिक जीवन आणि भाग्य कारक ग्रह आहे.येथे जाणून घ्या,बृहस्पती ग्रहाच्या पूजेचे सोपे उपाय…
१. प्रत्येक गुरुवारी महादेवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.या उपायाने गुरु ग्रहाचे दोष दूर होतात.
२. गुरुवारी गुरु ग्रहानिमित्त व्रत ठेवा.या व्रतामध्ये पिवळे वस्त्र परिधान करावेत तसेच मीठ न टाकलेला आहार घ्यावा.जेवणात पिवळ्या रंगाचे पदार्थ उदा. बेसनाचे लाडू,आंबा,केळीचा समावेश करावा.
३. गुरु बृहस्पतीची मूर्ती किंवा प्रतिमा पिवळ्या रूपड्यावर विराजित करावी.त्यानंतर पंचोपचार पूजा करावी.पूजेमध्ये केशर,चंदन,पिवळे तांदूळ,पिवळे फुल अर्पण करावे.पूजा झाल्यानंतर आरती करावी.
४. गुरु मंत्राचा जप करावा.मंत्र : ॐ बृं बृहस्पते नमः मंत्र जपाची संख्या कमीतकमी १०८ असावी.
५. गुरूशी संबंधित पिवळ्या वस्तू दान कराव्यात.पिवळ्या वस्तू उदा.सोने, हळद, हरभन्याची डाळ, आंबा (फळ) इ.
६. गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठावे.स्नान केल्यानंतर भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावावा.त्यानंतर विष्णू सहस्त्रनामचे पाठ करावेत.
७. गुरुवारी संध्याकाळी केळीच्या झाडाजवळ दिवा लावावा.या झाडाची पूजा करून बेसनाचा लाडू किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
८. गुरुवारी पूजा झाल्यानंतर स्वतःच्या कपाळावर केशराचा टिळा लावावा.केशर नसल्यास हळदीचा टिळा लावू शकता.
९. गुरुवारी आई-वडील आणि गुरूंचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यावा.
या उपायांनी धन,संपत्ती, लग्न आणि भाग्याशी संबंधित बाधा दूर होऊ शकतात.










































































