Last Updated on 23 Jan 2024 5:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात बहे येथील रामलिंग बेटावर अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेल्या रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाची महाआरती पार पडली.खा. धैर्यशील माने व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वेदांतिका माने यांच्या हस्ते व हजारो भाविकांच्या अभूतपूर्व उपस्थितीत श्रीरामाची महाआरती पार पडली.महाआरतीला राम भक्तांची रेकॉर्डब्रेक उपस्थिती होती.
अयोध्येत रामजन्मभूमी येथे भव्य मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली.या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देशभर दिवाळी साजरी करा व दिवे लाऊन महाआरती करा,असे आवाहन केले होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहे पंचक्रोशीतील राम भक्तांनी येथील रामलिंग बेटावर विविध भक्तिपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

पहाटे महापूजा व अभिषेक करण्यात आला.प्रारंभी अनिल बडवे व उदय बडवे यांच्या हस्ते विधीवत पूजा पार पडली.रंगराव मुळीक व त्यांच्या सुविद्य पत्नी शांता मुळीक तसेच प्रा.अजित कुलकर्णी व त्यांच्या सुविद्य पत्नी राधा कुलकर्णी यांना पूजेचा मान मिळाला.सदगुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र येडेमच्छिंद्र यांनी रामरक्षास्तोत्र पठन व प्रभु श्री रामचंद्राच्या नामाचा गजर केला.दुपारी १२.२० वाजता खा. धैर्यशील माने व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वेदांतिका माने यांच्या हस्ते व हजारो भाविकांच्या अभूतपूर्व उपस्थितीत श्रीरामाची महाआरती पार पडली.यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली.

भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील,यदुराज थोरात,बी.जी.पाटील,पांडुरंग शेवाळे,नारायण कुंभार,मानसिंग पाटील,संजय पाटील,प्रा.मकरंद बडवे,निवास गुरव (नरसिंहपूर),श्रीधर पाटील,चंद्रसेन पाटील,अधिक बडवे,काशिनाथ हुबाले,विकास पाटील,भगवान यादव,संजय मुळीक,धनपाल थोरात शरद पवार,प्रवीण पाटील,निवास थोरात,लखन कोकीळ,उदय बडवे,हणमंत आवळेकर,केदारी पाटील,प्रमोद सुतार,जयवंत थोरात दीपक मोहिते,राजाराम गुरव,गणेश शिंदे,जयवंत फल्ले आदी तसेच बहे ग्रामस्थांनी या सोहळ्याचे नियोजन केले. गेल्या काही दिवसांपासून आयोजकांनी तयारी सुरु केली होती.
हजारो रामभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

दरम्यान, महाआरती झाल्यानंतर रामभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हजारो रामभक्तांनी याठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला.












































































