Last Updated on 22 Mar 2025 5:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतीक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर झालेला सन्मान हा आपणा सर्वांना अभिमानस्पद असल्याची भावना कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी प्रतीक पाटील यांचे कारखाना कार्यस्थळावर जंगी स्वागत करून अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रतीक पाटील यांनी अल्पावधीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेत शेतकऱ्यांचे जीवन सुसाह्य केल्याबद्दल त्यांचा आंतराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला आहे. याबद्दल राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विजयराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, जल सिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर.डी. माहुली, कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे, राजेंद्र चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतीक पाटील सत्कारास उत्तर देताना म्हणाले, हा केवळ माझा एकट्याचा सन्मान नसून हा आपल्या सर्व टीमचा सन्मान आहे. आपल्या सभासद शेतकऱ्यांचा, कामगारांचा, हितचितकांचा सन्मान आहे. राजारामबापू समूह हा आपला एक परिवार असून आ.जयंत पाटील हे आपले कुटुंब प्रमुख आहेत. भविष्यातही स्व.बापूंच्या विचाराने शेती व सहकार क्षेत्रात भरीव काम करू.
बाळासाहेब पवार (कुंडल) म्हणाले, प्रतीक पाटील यांनी केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात प्रथम शेतात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केलेला आहे. त्यांनी ठिबक सिंचन योजना,सच्छिद्र निचरा प्रणाली योजना अतिशय प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील एकरी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर केलेला आहे.
विठ्ठल पाटील म्हणाले, प्रतीक पाटील शेतकऱ्यांच्यासाठी नव-नव्या योजना राबवित आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात नवा उत्साह संचारला आहे.
यावेळी संचालक प्रदीपकुमार पाटील, दादासाहेब मोरे, शैलेश पाटील, रघुनाथ जाधव, प्रताप पाटील, दिलीपराव देसाई, अमरसिंह साळुंखे, अतुल पाटील, वैभव रकटे यांनी प्रतिकदादांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी स्वागत व प्रस्तावित केले. संचालिका प्रा.डॉ.योजना शिंदे-पाटील यांनी आभार मानले. संचालक दीपक पाटील, रमेश हाके, बबनराव थोटे, राजकुमार कांबळे, हणमंतराव माळी, कामगार प्रतिनिधी विकास पवार, मनोहर सन्मुख, सचिव डी.एम.पाटील, तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.










































































