Last Updated on 11 Sep 2021 2:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अॅड. धैर्यशील पाटील : माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार

येथील सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉलमध्ये माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्यावतीने पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
प्रा. शामराव इस्लामपूर पाटील म्हणाले, शहर परिसरातील गुन्हेगारीला आळा घालून कडक कारवाया करण्यासाठी अतिशय निष्ठेने वेळ देवून पो. नि. देशमुख यांनी प्रॉपर पोलिसींग केले आहे. पोलिस उपधिक्षक पिंगळे यांनी वरद खामकर या अपहृत विद्यार्थ्याला सुखरुप परत आणण्याच्या तपासा पासून ते अनेक कडक पोलिस कारवायाबद्दल देशमुख यांची प्रशंसा केली.

उद्योजक सर्जेराव यादव म्हणाले, इस्लामपूर परिसरात या दोन अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे शांतता, सुव्यवस्था निर्माण झाली आहे. सत्कारमुर्ती देशमुख यांनी त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल प्रथमच मोठा सत्कार झाल्याची भावना व्यक्त केली. पारदर्शी कार्यक्षम सेवा बजावण्याचा आनंद इस्लामपुरात अधिक मिळाला असे ते म्हणाले.

यावेळी देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सुकेशिनी देशमुख यांचा रणजित मंत्री यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. अशोक शिंदे, अॅड. विजय काईंगडे, उद्योजक दिपक कोठावळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्कारमूर्ती देशमुख यांचे आई-वडील तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, सदस्य व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. उद्योजक विजय पाटील, डॉ. प्रविण पोरवाल, उद्योजक आनंदराव शेलार,उद्योजक उदय संभारे,विक्रम घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उमेश कुरळपकर, सचिव प्रा. महेश जोशी, उद्योजक विकास राजमाने, पो. हे.कॉ. संपत वारके, अमित यादव, शुभम् यादव, गणेश पोतदार यांनी संयोजन केले. प्रा. डॉ. सुरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. गौतम रायगांधी यांनी आभार मानले.










































































