Last Updated on 24 Jun 2025 5:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
छत्रपती संभाजीनगर । शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘अधिकारी शेताच्या बांधावरी’ या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आज सकाळी कृष्णपूरवाडी या गावात गेले. तेथे शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
जिल्हाधिकारी स्वामी आज सकाळीच साडेनऊ वाजेच्या सुमारास कृष्णपूरवाडी, कोलठाण येथील शेतकऱ्यांकडे गेले. जनार्दन किसन दौंड, कोलठाण गट नं.३३, धरमसिंग कारभारी गोलवाल, कृष्णपुरवाडी गट नं.४१, काळुसिंग मानसिंग बहुरे, कोलठाण, गट नं.२३, मोतीलाल हिरालाल बहुरे कृष्णपुरवाडी गट नं.३७, हरिदास पंडीत मोठे कोलठाण गट नं.३५/१, त्र्यंबक नवलाची कवंदे कृष्णपूर वाडी गट नं.८५ तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

शेतकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर शेत रस्ता, खत ,बी – बियाणांची उपलब्धता याविषयी आपल्या समस्या मांडल्या. पीक कर्ज उपलब्धतेबाबतही शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांना वेळेत व रास्त दरात बियाणे, खते उपलब्ध करुन देण्याबाबत उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. पीक कर्ज उपलब्धतेबाबत बॅंकांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याबाबत निर्देशित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच या परिसरातील शेतरस्त्यांच्या समस्येबाबतही तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 04 Mar 2026 11:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit पणजी । न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप काशीनाथ शिंदे यांनी गोव्याचे लोकायुक्त म्हणून ऐतिहासिक ओल्ड दरबार हॉल, राजभवन येथे आयोजित... Read more













































































