Last Updated on 25 Jul 2024 9:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने सायंकाळी 7 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 20 हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहेत.आज दि. 25 जुलै 2024 रोजी सायंकाळी 8 वाजता धरणामध्ये एकूण 79.40 टीएमसी 75.43 टक्के पाणीसाठा झाला आहे.कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 85 हजार 937 क्युसेस अशी सुरू आहे.
कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असून कोयनेच्या जल साठ्यात देखील चांगली वाढ झाली आहे.कोयना धरणामध्येही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सद्यस्थितीत दुपारी चारपासून सांडव्यावरून 10 हजार विसर्ग चालू होता.तथापि, पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने येव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 20 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे.धरण पायथा विद्युत गृहामधील 1050 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 21 हजार 050 क्युसेक्स असेल.
त्याचबरोबर उद्या सकाळी 7 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 30 हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.त्यामुळे उद्या धरण पायथा विद्युत गृहामधील 1050 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 31 हजार 050 क्युसेक्स असेल.
गुरुवारी (25 जुलै) सायंकाळी 5 वाजता पर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 90 मिलिमीटर, नवजा येथे 70 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 77 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 79.40 टीएमसी इतका झाला असून धरण 75.43 टक्के भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3 हजार 147 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 692 आणि महाबळेश्वरमध्ये 3 हजार 185 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 30.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. आहे. आयर्विन पूल सांगली येथे इशारा पातळी 40 फूट असून आज सायंकाळी 5 वाजता 33 फूट इतकी पाणीपातळी आहे. वारणा धरणातून 10 हजार 460, कोयना धरणातून 11 हजार 50 तर अलमट्टी धरणातून 2 लाख 75 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
पूर नियंत्रण कक्ष,सांगली पाटबंधारे विभाग सांगली
दिनांक–25/07/2024 5:00 PM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी)
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/23’03”
2) बहे पूल-(23.7)11’09”
3) ताकारी पूल (46)/37’0″
4)भिलवडी पूल -(53)35’06”
5)आयर्विन- (45)/33’0″
6)राजापूर बंधारा-(58)/46’03”
7) राजाराम बंधारा-(43)/43’04”
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 52230
2) आयर्विन पूल – 68033
3) राजापूर बंधारा – 160750
4) राजाराम बंधारा – 62967
5) कोयनाधरण- 78.29 TMC/11050
6)वारणा धरण- 30.29 TMC/ 10460
7)अलमट्टी धरण- 88.885
आवक – 176466
जावक- 2,75,000












































































