Last Updated on 08 May 2023 4:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री पिनारायि विजयन आज याठिकाणी भेट दिल्यानंतर हे निर्णय जाहीर केले. या अपघातात २२ जण मृत्युमुखी पडले असून ८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री विजयन यांनी आज आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांबरोबर तिरुरंगडी इथल्या तालुका रुग्णालयाला भेट देऊन अपघातग्रस्तांचा विचारपूस केली. नदी पात्रात अपघाताच्या ठिकाणी शोध मोहीम सुरु आहे. नौदलाचे पाणबुडे आणि एनडीआरएफचं पथक राज्य पोलीस आणि अग्निशमन पथकाबरोबर शोध मोहिमेत सहभागी झालं आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोट अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोंन लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.












































































