Last Updated on 16 Jul 2025 9:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
युवा नेते प्रतीक पाटील यांनी ह्रदयरोग बालकांच्या पालकांना दिला दिला धीर
सांगली । आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही काळजी करू नका. सर्व ठीक होईल,”या शब्दात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते प्रतीक पाटील यांनी मुंबईला ह्रदयरोग शस्त्रक्रिया करण्यास निघालेल्या लहान बालकांच्या आई-वडिलांना धीर दिला. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियामच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुंबई येथील एमआरआर चाईल्ड हॉस्पिटलमध्ये मोफत या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या प्रत्येक शस्त्रक्रियेस ६ लाख खर्च आहे.
वाळवा तालुक्यातील कुरळप व शिरगाव आणि मिरज तालुक्यातील तुंग गावातील ३ लहान बालकांना रुग्ण वाहिकेतून घेऊन त्यांचे आई-वडील मुंबईला घेऊन निघाले होते. अभियानने सर्व व्यवस्था केली आहे,तरीही आपल्या बाळाची शस्त्रक्रिया कशी होईल? याची भीती पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. इस्लामपूर येथे युवा नेते प्रतीक पाटील यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईक चौकशी केली आणि काळजी करू नका. आम्ही आपल्या सोबत आहे. काही अडचण आल्यास संपर्क करा,असा धीर दिला.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.नरसिंह देशमुख, सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ.प्रमोद चौधरी, सांगलीचे आयुब बारगीर, प्रा.शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, संजय पाटील, सुनिता देशमाने, संग्राम जाधव, माणिक पाटील, वैशाली पाटील, अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे,संघटक शशिकांत वायदंडे, ओंकार चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व अभियानचे संघटक उपस्थित होते.














































































