Last Updated on 24 Aug 2023 6:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Chess World Cup 2023 : विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने आर. प्रज्ञानंदचा पराभव केला आहे.आर. प्रज्ञानंद इतिहास रचता रचता राहिला आहे.दोन डाव अनिर्णित राहिल्यानंतर टायब्रेकर डावात मॅग्नस कार्लसन प्रज्ञानंदला पराभूत करत वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.
मॅग्नस कार्लसन अन्नातून विषबाधा झाल्याने अस्वस्थ होता.मात्र त्या स्थितीतही त्याने आर. प्रज्ञानंदला चांगली झुंज दिली.आर. प्रज्ञानंदचा पराभव झाला असला तरी त्याने मॅग्नस कार्लसनला चांगलेच झुंजवले. अझरबैजानच्या बाकू येथे हा सामना पार पडला.
याआधी झालेले दोन्ही डाव अनिर्णित राहिले होते.मंगळवारी पहिला डाव झटपट बरोबरीत सोडवला गेला होता. प्रज्ञानंदने कार्लसनला 35 चालीतच डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले होते. तर दुसरा डावही अनिर्णित राहिला होता. 30 चालीनंतर दोघांनीही बरोबरी साधली होती.यानंतर आज सामना पार पडला आणि टायब्रेकर डावात निर्णय झाला.










































































