Last Updated on 25 Nov 2024 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ऊसाला पहिली उचल ४ हजार रुपये मिळावी व दुसरा हप्ता ५०० रुपये मिळावा अशी बळीराजा शेतकरी संघटनेने मागणी आहे. पहिली उचल ४ हजार रुपये व दुसरा हप्ता ५०० रुपये जाहीर करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे युवाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिला आहे.
याबाबत शेजारी संघटनांच्या वतीने बळीराजा संघटनेचे युवाध्यक्ष गणेश शेवाळे तसेच जयवंत पाटील, सुनील सावंत, रणजित पाटील आदींनी कराड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही मागणी केली. याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री पवार यांना देण्यात आले.
कारखानदारांनी ऊसाला पहिली उचल ४ हजार रुपये व दुसरा हप्ता ५०० रुपये जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे युवाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिला आहे.










































































