Last Updated on 24 Jan 2025 8:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या वतीने आयोजन
इस्लामपूर येथील पोलिस परेड मैदानावर होणार स्पर्धा
सांगली । इस्लामपूर येथील निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या वतीने सोमवार दि. २७ जानेवारी ते गुरुवार दि. ३० जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धा २०२५ चे इस्लामपूर येथील पोलिस परेड मैदानावर आयोजन करण्यात येत असल्याची माहिती निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशनचे संस्थापक अजित पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना अजित पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून उरुण इस्लामपूर नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. इस्लामपूर शहरातील वेगवेगळ्या वयोगटातील २५० हून अधिक खेळाडू निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशनच्या माध्यमातून हॉकी सारख्या राष्ट्रीय खेळाचा सराव करत आहेत. अनेक खेळाडू आर्मी, नेव्ही, पोलिस व प्रशासकीय सेवेमध्ये सेवा बजावत आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे कौतुक व्हावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते.
या स्पर्धेमध्ये मुंबई शहर पोलिस, एस.आर.पी. एफ.पुणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई, मराठा लाईट इन्फंट्री युनिट कोल्हापूर, महाराष्ट्र क्रिडा मंडळ कोल्हापूर, छावा स्पोर्ट्स कोल्हापूर, कोल्हापूर रेंज पोलिस, सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन फलटण, खालसा युथ क्लब नांदेड, वाय. एस. एस. सोलापूर, निशिकांत दादा स्पोर्ट्स अ व ब असे संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आ. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते व हुतात्मा दुध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी, उरुण इस्लामपूर नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, माजी नगरसेवक विक्रम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, माजी नगरसेवक वैभव पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रविण माने, भाजपाचे शहर अध्यक्ष अशोक खोत, उपाध्यक्ष भास्कर मोरे, सांगली जिल्हा हॉकी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. जी. एस. पाटील, प्रांजली अर्बन निधी बँकेचे चेअरमन अक्षय पाटील, सयाजी जाधव, उमेश जाधव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.












































































