Last Updated on 17 Aug 2025 12:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूल मध्ये गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दही हंडी साजरी करण्यात आली. राधा आणि श्रीकृष्णच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी गोविंदा गोपाळा म्हणत दहीहंडीच्या खेळाचा आनंद लुटला.
इस्लामपूर येथील प्रशसकीय इमारतीच्या परीसरात असणाऱ्या ‘मुक्तांगण’ मध्ये सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी खेळांतून शिक्षण दिले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लहानपणा पासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात.

इस्लामपूर : येथील मुक्तांगण प्ले स्कूल मध्ये दहीहंडी साजरी करताना चिमुकली मुलं.
दहीहंडी का व कशी साजरी करतात याची माहिती दिली गेली. दहिहंडी फोडण्यासाठी मुलांनी प्रयत्न केले. मुलांनी राधा व कृष्णा च्या वेशभूषा केल्या होत्या .राधांनी टीपरीचा फेर धरून आनंद साजरा केला. तर बालगोपाल दहिहंडी फोडण्यात चपळाई दाखवत होते.मुलांना थरारक खेळाचा अनुभव देताना दही हंडी बाबत चित्रफिती दाखवण्यात आल्या.
संचालिका वर्षाराणी मोहिते म्हणाल्या, मुलांच्यातील साहस वाढवणे,एकीचे महत्व पटवून देण्यासाठी दहिहंडी चा उपक्रम राबविण्यात आला.राधा व कृष्ण या व्यक्तीरेखा समजावून देण्यात आल्या.
धनश्री पाटील, अश्विनी राऊत, ऋतू धनवडे, प्रगती मोरे, रतीका पाटील यांनी संयोजन केले.










































































