Last Updated on 23 Feb 2025 12:22 AM by Sanjay Patil/Adhorekhit
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना 23 फेब्रुवारी (रविवार) रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. हा सामना दुबईत होत असला तरी तुम्हाला घर बसल्याही मॅच लाईव्ह पाहता येणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा टॉस दुपारी 2.00 वाजता केला जाईल. टॉसनंतर दोन्ही कर्णधार आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू काही वेळ सराव करतील. सरावानंतर काही वेळातच दोन्ही देशांचे राष्ट्रगीत सुरु होईल. राष्ट्रगीत झाल्यावर काही वेळातच हा सामना सुरु होईल. हा सामना टॉसनंतर अर्ध्या तासानंतर म्हणजेच दुपारी 2.30 वाजता सुरु होणार आहे.
या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओस्टारवर मोफत पाहता येईल, तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवरही हे प्रक्षेपित केले जाईल. सामन्याचे सर्व तिकीट आधीच विकले गेले आहेत, त्यामुळे प्रक्षेपण पाहणे हा प्रेक्षकांसाठी एकमेव पर्याय आहे.
लाइव्ह प्रक्षेपण
टीव्हीवर : हा सामना स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर थेट प्रक्षिप्त केला जाईल.
- दूरदर्शनकडे भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचे प्रसारणाचे हक्क आहेत. त्यामुळे ते हा सामना प्रसारीत करू शकतात.
मोबाईलवर : जिओ-हॉटस्टार वर हा सामना थेट पाहता येईल. क्रिकेट चाहते मराठीसह एकूण 9 भाषांमध्ये कमेंट्री ऐकू शकतात.
जिओ-हॉटस्टार वर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची थेट प्रक्षेपण कमेंट्री 9 भाषांमध्ये उपलब्ध असेल. त्यामध्ये मुख्यतः खालील भाषांचा समावेश होईल:
- हिंदी
- English
- मराठी
- தமிழ் (तामिळ)
- తెలుగు (तेलुगू)
- ಕನ್ನಡ (कन्नड)
- ਪੰਜਾਬੀ (पंजाबी)
- اردو (उर्दू)
- বাংলা (बंगाली)
हा सामना 50-50 षटकांचा (वनडे) असेल. सामन्याच्या वेळापत्रकानुसार, नाणेफेक दुपारी 2:00 वाजता होईल, आणि सामना 2:30 वाजता सुरू होईल.
भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी कसे असतील दोन्ही संघ…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.










































































