Last Updated on 18 Mar 2026 1:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
ईश्वरपूर ।
माजी विद्यार्थ्यांनी वाळवा तालुका शिक्षण संस्था आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाशी निर्माण झालेला अतूट ऋणानुबंध अखंड जपावा. परस्परांशी असणारी मैत्री, आपले करिअर आणि सामाजिक बांधिलकी देखील जोपासत राहा; असे आवाहन संस्थेचे सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये ॲड. पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अधिकराव पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष जयवंतराव जाधव तसेच प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव यांच्यासह विविध विभाग प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या प्रगती बरोबरच माजी विद्यार्थी संघटनेची भूमिका आणि जबाबदारी याबद्दल माहिती दिली. माजी विद्यार्थी विनोद कोळेकर,ॲड.उमेश कोळेकर,ॲड.रोहन पेठकर, अनुराग कबाडे, सानिका गायकवाड, राफिया शेख,शंकर पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संस्था आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या बद्दल कृतज्ञता प्रकट केली.
अध्यक्ष अधिकराव पाटील यांनी माजी विद्यार्थी संघ कॉलेजच्या विकासासाठी यापुढील काळात कसे योगदान देईल याबद्दल मनोगत व्यक्त केले. यापुढे नवीन कार्यकारणी अधिक सक्षमतेने काम करील, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक डॉ. एच. ए. नारायणकर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रो .डॉ अशोक शिंदे, सायन्स विभाग प्रमुख प्रा. संतोष पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा.डॉ. मंगल लोंढे यांनी आभार मानले.










































































