Last Updated on 22 Mar 2026 7:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
हस्तकला ही एक कला नसून सर्जनशीलता आहे. कला जोपासण्याने जीवनात सकारात्मक बदल होतात. वेळेचा सदुपयोग करून हस्तकला अवगत करता येते; असे प्रतिपादन प्रा.अमोल चांदेकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये कौशल्याधारित हस्तकला अनुभव कार्यशाळा ज्युनिअर विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एम. जाधव होते. प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले,आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने कला जोपासावी.त्यामुळे ताण तणाव कमी होण्यास मदत होते.आपण काहीतरी सुंदर करू शकतो ही भावना आत्मविश्वास वाढवते. कार्यशाळेमध्ये इयत्ता अकरावी मधील विद्यार्थिनी अक्षरा हिने कागदापासून कमळाचे फूल कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. पाहुण्यांचा परिचय प्रा. स्वाती चव्हाण यांनी करून दिला.
प्रा. गणेश स्वामी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. ओंकार कोकाटे यांनी मानले.










































































