Last Updated on 09 Aug 2021 4:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली : परदेशी किंवा देशाअंतर्गत प्रवास करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे. आतापर्यंत कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोविन पोर्टल आणि दुसरे म्हणजे आरोग्य सेतु अॅप. आता सर्वांसाठी कोरोना लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करणे ही प्रक्रिया अधिक भारत सरकारने सोपी केली आहे. त्यानुसार आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे.
लोकांना आतापर्यंत वॅक्सीन सर्टिफिकेट CoWIN वेबसाईट अथवा आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅपवरून डाउनलोड करावे लागत होते. मात्र आता सरकारने MyGov Corona Helpdesk WhatsApp Chatbot द्वारे प्रमाणपत्र डाउनलोड केले जाऊ शकते.
यासाठी वापरकर्त्यांना MyGov कोरोना हेल्पडेस्क WhatsApp चॅटबॉटचा वापर करावा लागणार आहे. आपल्या फोनमध्ये +९१ ९०१३१५१५१५ हा क्रमांक सेव्ह करावा. नंतर या नंबरवर व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवावा. वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी चॅटमध्ये “Download certificate” असा मॅसेज करा.
चॅटबॉस तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ६ अंकांचा ओटीपी (OTP) पाठवेल. तो ओटीपी त्या नंबरवर पाठवावा लागेल. ओटीपी वेरिफाय होईल त्यांनतर तुम्हाला नाव आणि मोबाईलनंबरसह एक मॅसेज येईल. यावेळी तुम्हाला विचारले जाईल की, वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी १ टाईप करा. त्यानंतर १ लिहून पाठवल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड करता येईल.














































































