Last Updated on 11 Mar 2026 4:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय यांच्या वतीने शनिवार दि.१४ मार्च रोजी विवेक वाहिनीची राज्यस्तरीय परिषद आयोजित केली आहे. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रा. शामराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केआरपी कॉलेजमध्ये सकाळी ११ वाजता उदघाटन सोहळा होणार आहे. ही माहिती प्राचार्य डॉ.टी.जे.शिंदे, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी दिली
अंनिसच्या पुढाकाराने महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी सुरू झालेल्या विवेक वाहिनी या उपक्रमास २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ही सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत ही एक दिवशीय परिषद आयोजित केली आहे. कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर.डी. सावंत, वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील, अंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे, विवेक वाहिनीच्या राज्य कार्यवाह प्राचार्य सविता शेटे, सहकार्यवाह डॉ.संतोष जेटीथोर, सहकार्यवाह डॉ विठ्ठल घुले, राज्य सरचिटणीस कृष्णा स्वाती आदी मान्यवर उदघाट्न सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
“समाज माध्यमे आणि तरुणाई” यावर विषयावर पत्रकार प्रशांत कदम (मुंबई), आणि ज्येष्ठ संपादक वसंत भोसले (सांगली) हे मार्गदर्शन करणार आहेत. तर “वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी युवा “या विषयावर माहिती तंत्रज्ञान तज्ञ, नामवंत लेखक अच्युत गोडबोले,आणि खगोल अभ्यासक, विज्ञान लेखक प्राचार्य डॉ नितीन शिंदे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. “राज्यातील विवेक वाहिनीचा आढावा आणि भविष्य वेध”याबद्दलही चर्चा होणार आहे. तसेच प्राचार्य आर.डी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. एक दिवसाची परिषद निशुल्क असून पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. विवेक वाहिनी च्या कार्याचे पोस्टर प्रदर्शन ही ठेवलेले आहे.
प्रा.प्रशांत पाटील,प्रा शरद पाटील, प्रा.विकास सोनवणे, प्रा.काशिलिंग गावडे, प्रा राम घुले, अजय भालकर, बजरंग सपकाळ, डॉ सुदाम माने, तसेच आर.आय.टी. विवेक वाहिनी आदी परिषदेचे संयोजन करीत आहेत.










































































