Last Updated on 12 Sep 2022 9:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने आज आपला संघ जाहीर केला.त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकांसाठीही भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. र्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांना या कालावधीमध्ये बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात येणार आहे.16 ऑक्टोबर 2022 ला टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे.
ज्यामध्ये कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचं संघात पुनरागमन होणं ही टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे.
जडेजा दुखापतीमुळे बाहेर, अक्षरचे नशीब उजडले
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा आशिया कपदरम्यान जखमी झाला होता. नुकतीच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे तो पुढील काही आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. यामुळेच रवींद्र जडेजा टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग नाही. त्याच्या जागी अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघात यावेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांना ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या पंधरा सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही, पण त्यांना राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे विश्चषकापूर्वी या दोघांना या मालिकेत चांगला सराव मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही मालिका शमी आणि चहर यांच्यासाठी महत्वाच्या असतील.
टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेलाला भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20 – 20 सप्टेंबर (मोहाली)
दुसरा T20I – 23 सप्टेंबर (नागपूर)
तिसरा टी-20 -25 सप्टेंबर (हैदराबाद)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिका
पहिला T20I – 28 सप्टेंबर (त्रिवेंद्रम)
दुसरा T20I – 2 ऑक्टोबर (गुवाहाटी)
तिसरा T20I – 4 ऑक्टोबर (इंदूर)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका-
पहिला वनडे- 6 ऑक्टोबर (लखनौ)
दुसरा वनडे- 9 ऑक्टोबर (रांची)
तिसरा वनडे- 11 ऑक्टोबर (दिल्ली)
T-20 विश्वचषकातील भारतीय संघाचं पूर्ण वेळापत्रक
17 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (सराव सामना) सकाळी 9.30
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड (सराव सामना) दुपारी 1.30
23 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुपारी 1.30
27 ऑक्टोबर – भारत विरुद्ध A2, दुपारी 12:30
30 ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 4.30
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश, 1.30
6 नोव्हेंबर – भारत विरुद्ध B1, 1.30











































































