Last Updated on 29 Sep 2022 6:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पाठीच्या समस्येमुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही.
बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही खेळला नव्हता. त्यांची जागा दीपक चहरने घेतली. बुमराहने आशिया कपमध्ये न खेळल्यानंतर पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो दिसला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखापतीमुळे पुढील पाच ते सहा आठवडे खेळू शकणार नाही.त्यामुळे आता भारतीय संघाला रविंद्र जडेजा आणि जसप्रित बुमराह या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत विश्वचषक जिंकणे सोपे नसणार आहे. तर येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकास सुरुवात होणार आहे.
बुमराहच्या माघारीनंतर टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उप-कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग
राखीव खेळाडू
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर










































































