Last Updated on 02 Jun 2023 12:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
येथे पाहा निकाल…
link वर क्लिक करा
👇👇👇👇
अधोरेखित ऑनलाईन डेस्क । दहावीचा निकाल उद्या लागणार आहे. विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्षा संपणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.गेल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. यावेळी शिक्षण विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे.यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 17 जूनला जाहीर झाला होता. राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला होता.परीक्षेत मुलीनीच बाजी मारली होती. मुलींची उत्तीर्ण झाल्याचे टक्केवारी 95.35 तर मुलांची 93.29 टक्के इतकी होती. यंदा दहावीचा निकाल किती टक्के लागतो आणि त्यात मुली की मुले बाजी मारतात,याबाबत राज्यात मोठी उत्सुकता आहे.
निकाल कसा बघायचा ?

येथे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून विद्यार्थी महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा निकाल 2023 पाहू शकतात…
🌑 सर्वप्रथम mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
🌑 मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र एसएससी निकाल लिंकवर क्लिक करा.
🌑 आवश्यक तपशील सबमिट करा आणि महाराष्ट्र 10वीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
🌑 निकाल PDF मध्ये नमूद केलेल्या तपशीलांची पडताळणी करा आणि डाउनलोड करा.
🌑 भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 10 वी निकाल 2023 ची प्रिंट काढा.
या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होतील
विद्यार्थी पुढील वैकल्पिक वेबसाइटवरून त्यांचा MH SSC निकाल 2023 तपासू आणि डाउनलोड करू शकतील.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.![]()
गुणपडताळणी कशी कराल ?
ऑनलाईन निकालानंतर दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक 03/06/2023 ते सोमवार, दिनांक 12/06/2023 पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक 03/06/2023 ते गुरूवार, दिनांक 22/06/2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.












































































