Last Updated on 17 Jun 2022 2:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यात एकूण 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
नऊ विभागांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल
राज्यातील 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के
दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.40 टक्के
राज्यातील 29 शाळांचा निकाल शून्य टक्के
मुंबई |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून यात 96.94 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (99.27 टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (95.90 टक्के) विभागाचा लागला आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 97.96 टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 टक्के. विद्यार्थिनीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 2 टक्क्याने जास्त आहे. याचा अर्थ असा ही यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 94.40 टक्के इतरा लागला आहे.
येथे पहा निकाल
क्लिक करा ⏬ www.mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in, https://lokmat.news18.com, https://www.indiatoday.in/education-today/results, http://mh10.abpmajha.com, https://www.tv9marathi.com/ board-result-registration-for-result-marksheet-10th
या संकेतस्थळांवर पाहता येतील.
दृष्टिक्षेपात निकाल
परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी (नियमित)- 15 लाख 84 हजार 790
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी – 15 लाख 68 हजार 977
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – 15 लाख 21 हजार 003
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – टक्के 96.94
विभागनिहाय निकाल
कोकण – 99.27 टक्के
पुणे – 96.96 टक्के
कोल्हापूर – 98.50 टक्के
अमरावती – 96.81 टक्के
नागपूर – 97 टक्के
लातूर – 97.27 टक्के
मुंबई – 96.94 टक्के
नाशिक – 95.90 टक्के
औरंगाबाद – 96.33 टक्के
गुणपडताळणी
विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकर व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार 20 जून ते बुधवार 29 जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार 20 जून ते शनिवार 9 जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.
12 वीची पुरवणी परीक्षा 21 जुलैपासून, तर 10 वीची 27 जुलैपासून सुरू होणार
12 वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत असेल. 10 वीची पुरवणी परीक्षा 27 जुलैला सुरू होईल. ही परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान असेल. 12 वीचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे,10 वीचे अर्ज 20 जूनपासून घेण्यास सुरुवात करणार आहे.
आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.“शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवा, यश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!”असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.







































































