Last Updated on 28 Feb 2026 7:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या उपस्थितीत रंगला २४ वा संगीत महोत्सव
६ हजार इस्लामपूरकरांनी लुटला स्वरांचा आनंद, ‘आविष्कार’ची स्वरमयी मेजवानी
सायली कांबळे-अंकुश भारद्वाजच्या ‘बॉलिवूड म्युझिक नाईट’ला तुफान प्रतिसाद
ईश्वरपूर ।
सैराटमधील झिंगझिंगाटआणि चंद्रा या लावणीपासून हम्मा हम्मा, दम मारो दम, ढोल भाजे ढोलपर्यंत एकापेक्षा एक सरस आणि वैविध्यपूर्ण गाणी सादर करीत इंडियन आयडॉलफेक सायली कांबळे,यंग बॉलिवूड सिंगर अंकुश भारद्वाज, युवा गायक सचिन वाल्मिकी यांनी उरुण ईश्वरपूरकर कलारसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील आविष्कार कल्चरल ग्रुपने २४ व्या संगीत महोत्सवानिमित्त “बॉलीवूड म्युझिक नाईट” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्यासह सुमारे ६ हजार कला रसिकांनी या बहारदार कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. खा.एस.डी.पाटील नगरातील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात हा पहिल्या दिवशीचा कार्यक्रम संपन्न झाला.
अंकुश भारद्वाज यांनी देवा श्रीगणेशाने सुरुवात केली. संदेशे आते है,लिखे जो खत तुझे, बदन मे सितारे हुऐ,दिल गलती कर बैठा, पिया तू,हरे कृष्णा, दम मारो दम,चुम्मा चुम्मा,तर सायली कांबळे यांनी परेशान परेशान, हमारी अधुरी कहानी, बाहो मे चले आ,हम्मा हम्मा आदी गाणी सादर केली. त्यांनी समारोपात छोरा गंगा किनारे वाला, जानू मेरी जान,कहोना प्यार है,यमला पगला दिवाना आदी एकत्रित गाणी सादर केली आणि सैराट मधील झिंग झिंगाटने समारोप केला. यावेळी युवा गायक सचिन वाल्मिकी यांनीही बहारदार गाणी सादर केली. कार्तिकी राव यांनी ओघवत्या भाषेत संचालन केले.
प्रारंभी कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ.सचिन पाटील,त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. इरफाना पाटील,डॉ.विकास बामणे यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी आविष्कारचे कार्याध्यक्ष भूषण शहा यांनी
प्रास्ताविक केले.

मध्यंतरी युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते उरुण ईश्वरपूरचे उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, आष्टा नगरीचे उपनगराध्यक्ष दिलीपराव वग्याणी, कलाकार,तसेच आविष्कारचे प्रताप पाटील (कवठेकर) यांचा सत्कार करण्यात आला.
चितळे उद्योग समूहाच्या स्मिता चितळे,ऋचा चितळे,विजयराव यादव,डॉ.अशोक पाटील, सुस्मिता जाधव,नगरसेवक संग्राम पाटील,सुनील मलगुंडे,संदीप माने,पुष्पलता खरात,बाळासाहेब पवार,उद्योजक नितीन झंवर,आर.डी.माहुली माहुली,विकास कर्डीले,एस.डी.कोरडे,डॉ. साईराज पाटील यांच्यासह कला रसिकांनी कर्यक्रमाचा आंनद लुटला.
आविष्कारचे मोहन चव्हाण,अध्यक्ष प्रा. कृष्णा मंडले, उपाध्यक्ष राजेंद्र माळी, सचिव विजय लाड, नजीर शेख, सतिश पाटील, सुनिल चव्हाण, प्रा. प्रदीप पाटील, खजिनदार विश्वास कदम, सहसचिव विजय नायकल, संतोष पाटील, प्रशांत पाटील, हर्षवर्धन घोरपडे, सौरभ सावंत, श्रेयस पाटील, विशाल पाटील यांच्यासह आविष्कारच्या कार्यकर्त्यांनी या संगीत मैफलीचे उत्कृष्ठ संयोजन केले. सदानंद गाडगीळ सांगली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.












































































