Last Updated on 13 Oct 2025 10:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या या आरक्षण सोडतीस उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अजय पवार, तहसीलदार (सर्वसाधारण) लीना खरात आदी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक – 2025 साठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी जिल्हाधिकारी सांगली यांच्यास्तरावर ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
सोडतीनुसार गटनिहाय आरक्षण, निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव अनुक्रमे पुढीलप्रमाणे
महिला सर्वसाधारण – 46 येलूर, 48 वाकुर्डे बुद्रुक, 5 जाडरबोबलाद, 53 आरग, 20 वांगी, 14 नागनाथनगर नागेवाडी, 12 डफळापूर, 47 पणुंब्रे तर्फे वारूण, 7 संख, 16 करंजे, 3 निंबवडे, 38 कासेगाव, 39 वाटेगाव, 15 लेंगरे, 45 बागणी, 30 देशिंग, 33 दुधोंडी, 52 एरंडोली, 36 रेठरे हरणाक्ष,
महिला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग – 21 देवराष्ट्रे, 40 पेठ, 13 बिळूर, 37 बोरगाव, 19 कडेपूर, 57 बुधगाव, 59 कवठेपिरान, 18 तडसर,
महिला अनुसूचित जाती प्रवर्ग – 61 म्हैसाळ (एस), 55 मालगाव, 56 कवलापूर, 54 बेडग
सर्वसाधारण – 10 बनाळी, 58 कसबे डिग्रज, 4 खरसुंडी, 22 मांजर्डे, 50 मांगले, 26 चिंचणी, 2 करगणी, 32 कुंडल, 51 भोसे, 35 भिलवडी, 25 येळावी, 44 बावची, 8 दरिबडची, 17 भाळवणी, 42 कामेरी, 49 कोकरूड, 24 विसापूर, 43 चिकुर्डे, 27 मणेराजुरी,
नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग – 11 शेगाव, 1 दिघंची, 9 मुचंडी, 29 कुची, 28 ढालगाव, 41 वाळवा, 34 अंकलखोप, 60 समडोळी.
अनुसूचित जाती प्रवर्ग – 31 रांजणी, 6 उमदी, 23 सावळज
दहा पंचायत समितीच्या 122 निर्वाचक गणांसाठी संबंधित तहसिलदार यांच्यास्तरावर आरक्षण सोडत काढण्यात आली.

आरक्षण सोडत : हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार – जिल्हाधिकारी अशोक काकडे
जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सांगली जिल्हा परिषद 61-निवडणूक विभाग व 10 पंचायत समिती मधील 122-निर्वाचक गणांची आरक्षण सोडत झाली आहे. या आरक्षण सोडतीवर काही हरकती व सूचना असतील तर दिनांक 14 ते 17 ऑक्टोबर 2025 अखेर कार्यालयीन वेळेत संबंधित तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी, सांगली कार्यालय येथे स्वीकारण्यात येतील, असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) च्या तरतुदी अन्वये जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रियांसह) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणांबाबत जिल्हाधिकारी, सांगली यांच्या दिनांक 13 ऑक्टोबर 2025 च्या प्रारूप आरक्षणाच्या अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली, सांगली जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व सर्व पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने / हरकती / सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावेत. या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने/हरकती/सूचना इत्यादी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.






































































