Last Updated on 23 Mar 2026 5:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
बहे (ता.वाळवा) येथील तीर्थक्षेत्र रामलिंग बेटावरती प्रतिवर्षाप्रमाणे रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. २६ मार्च रोजी श्री रामनवमी आणि २ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बडवे-पुजारी, बहे ग्रामपंचायत व रामलिंग बेट देवस्थान समिती यांनी दिली आहे.
रामनवमीच्या दिवशी पहाटे ५:३० वाजता रामलिंगावर महाअभिषेक आणि महापूजा संपन्न होईल. सकाळी १० ते ११ या वेळेत ह.भ.प. लखन कोकीळ महाराज यांचे प्रवचन होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता ह.भ.प. न्यायाधीश मदन भालचंद्र गोसावी (विधी व न्याय सल्लागार, महाराष्ट्र शासन) यांचे रामजन्मकाळाचे कीर्तन होणार आहे. माध्यान्ह समयी ठीक १२ वाजून ३३ मिनिटांनी प्रभू श्रीरामांचा जन्मकाळ सोहळा साजरा केला जाईल. या निमित्ताने माजी मुख्याध्यापक तुकाराम साळुंखे व भाजप प्रांत सदस्य प्रसाद पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हनुमान जयंतीनिमित्त २ एप्रिल रोजी पहाटे श्री हनुमान मूर्तीस महाअभिषेक व पूजा होईल. त्यानंतर ह.भ.प. लखन कोकीळ महाराज यांचे हनुमान जन्मकाळाचे कीर्तन होईल. सूर्योदयासमयी ठीक ६ वाजून ३३ मिनिटांनी हनुमान जन्मकाळ साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी हणमंतराव आवळेकर व जयकर पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
रामलिंग बेटावरील या दोन्ही उत्सवांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बडवे-पुजारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.










































































