Last Updated on 07 Oct 2022 7:44 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बंगळुरू । येथे प्राे कबड्डी लीगच्या नवव्या सत्राला शुक्रवारपासून सुरुवात हाेत आहे. सलामीला गत चॅम्पियन दबंग दिल्ली आणि यू मुंबा यांच्यात लढत रंगणार आहे. यादरम्यान नव्या नियमासह लीगला सुरुवात हाेणार आहे.यादरम्यान रेडरसाठी सेल्फ आऊटचा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.यंदाच्या सत्रातील सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे आयाेजित करण्यात आले आहेत.सायंकाळी 7 वाजता हा महासंग्राम सुरु होणार आहे.

बंगळुरू येथील श्री कांतिवीरा इंडोर स्टेडियम आजपासून पहिले सत्र सुरु होणार असून पुण्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात (बॅडमिंटन हॉल) 28 ऑक्टोबरपासून स्पर्धेचा उत्तरार्ध पार पडणार आहे.
सलामीला गत चॅम्पियन दबंग दिल्ली आणि यू मुंबा यांच्यात लढत रंगणार आहे.पहिल्याच दिवशी सलामीच्या लढतीनंतर यजमान बंगळुरू बुल्स आणि तेलुगू टायटन्स समाेरासमाेर असतील. त्यानंतर जयपूर आणि यूपी याेद्धा यांच्यात सामना रंगणार आहे.
या मोसमात प्रो कबड्डी लीगमध्ये चाहत्याना पुन्हा थेट स्टेडियम मध्ये हजर राहता येणार आहे.भव्य उदघाटन सोहळ्यानंतर क्रीडा प्रेमींना पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.पहिल्या 66 सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये पहिल्या दोन दिवसातच सर्व 12 संघ मैदानावर उतरणार आहेत.इतकेच नव्हे तर प्रो कबड्डी लीगच्या साखळी फेरीत दर शुक्रवार व शनिवारी तीन-तीन सामने रंगणार आहेत.
पंचांच्या संख्येत वाढ
यंदाच्या नवव्या सत्रापासून प्राे कबड्डी लीगमध्ये पंचांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत ही संख्या 38 हाेती. आता यात वाढ हाेणार असल्याचे चित्र आहे.शिबिरात 70 पंचांनी सहभाग नाेंदवला हाेता.
रेडरसाठी नवा नियम
लीगमध्ये रेडरसाठी आता सेल्फ आऊटचा नियम लागू हाेणार आहे. जज लाॅबीच्या बाहेर गेला किंवा त्या रेषेला स्पर्श केल्यासही रेडरला बाद दिले जाईल.यादम्यान टीमचे डिफेंडर बाद राहणार नाहीत. त्यांना हा नियम लागू नसेल. गतवर्षी बंगळुरू टीमच्या एका रेडरने सेल्फ आऊटसह नऊ गुण संपादन केले हाेते. यादरम्यान सातही डिफेंडर सेल्फ आऊट झाले हाेते.












































































