Last Updated on 06 Jul 2023 5:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे.या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा 2-2 हजार रुपये दिले जातात,याचा अर्थ शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ मिळतो.त्याचबरोबर यावेळी शेतकऱ्यांना 14 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. पण त्याआधी तुम्हाला हप्ता मिळेल की नाही हे तपासले पाहिजे.चला तर मग जाणून घेऊया तुम्ही हे कसे तपासू शकता….
स्टेटस (स्थिती) तपासण्याचा मार्ग
स्टेप 1
तुम्हीही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल आणि स्टेटस तपासून हप्त्याबद्दल जाणून घ्यायचे असेल,तर तुम्ही हे करू शकता.
या प्रकरणात,तुम्हाला अधिकृत पीएम किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जावे लागेल.
स्टेप 2
किसान पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल क्रमांक किंवा योजनेचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.
स्टेप 3
आता तुम्हाला स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल, जो एंटर करावा लागेल
त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे लागेल
तुम्ही हे करताच तुमच्या समोर स्क्रीनवर तुमचे स्टेटस दिसेल.
स्टेप 4
येथे स्टेटसमध्ये तुम्हाला E-KYC, पात्रता आणि जमीन साईडिंगच्या पुढे लिहिलेला मेसेज पाहावा लागेल
या तिघांच्या पुढे किंवा कोणाच्याही समोर ‘नाही’ लिहिले तर तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहावे लागेल.
याशिवाय या तिघांच्या पुढे ‘हो’ लिहिल्यास हप्ता मिळू शकतो.






































































