Last Updated on 09 Jan 2026 6:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, 28 डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ & https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येणार आहे. ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashboard वर व पालकांसाठी https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर Interim Answer key (अंतरिम उत्तरसूची) या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता 9 ते 16 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 16 जानेवारी या विहित मुदतीनंतर त्रुटी आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही. वरील ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.













































































