Last Updated on 15 Nov 2022 7:27 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
नवी दिल्ली | राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 साठी खेळाडू आणि प्रशिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. टेबल टेनिसपटू शरथ कमल अंचता याची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी 25 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच, 7 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 4 खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबर रोजी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना हे पुरस्कार देतील.
मेजर ध्यानचंद खेल पुरस्कार प्राप्त शरथ कमल अचंता अनेक वर्षांपासून भारताचे नाव टेबल टेनिसमध्ये आणत आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी केली, यानंतर आता त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अर्जुन पुरस्कार जिंकणाऱ्या बहुतेक खेळाडूंनी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पदके आणली. 30 नोव्हेंबर 2022 (बुधवार) रोजी सायंकाळी 4 वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांचे पुरस्कार प्रदान केले जातील.
शरथ कमलची कारकीर्द
शरथ कमाल आज 40 वर्षांचा आहे.पण तीन महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत याच शरथ कमलनं भारताला तब्बल तीन सुवर्णपदकं जिंकून दिली होती.त्याच्या आजवरच्या कामगिरीचा सन्मान करताना भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी त्याच्या नावाची घोषणा केली आहे.टेबल टेनिसमध्ये शरथ कमल हे नाव आदरानं घेतलं जातं. वयाच्या चाळीसाव्या वर्षी शरथच्या खेळातील चपळता वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंसाठी शरथ कमल प्रेरणास्थान बनला आहे. तामिळनाडूच्या चेन्नईमधील कमलनं वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच टेबल टेनिसची रॅकेट हातात घेतली. या खेळाचा वारसा त्याला घरातूनच मिळाला होता. कारण शरथ कमलचे वडील आणि काका राज्य स्तरावर टेबल टेनिस खेळले होते. पण कमलनं त्यांच्याही बरंच पुढे जात मोठी मजल मारली.
कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
- शरत कमल अचंता – टेबल टेनिस
अर्जुन पुरस्कार 2022 विजेत्या सर्व खेळाडूंची यादी
जीवनगौरवसाठी ध्यानचंद पुरस्कार
- अश्विनी अकुंजी सी – ऍथलेटिक्स
- धरमवीर सिंग – हॉकी
- बीसी सुरेश – कबड्डी
- नीर बहादूर गुरुंग – पॅरा ऍथलेटिक्स
प्रशिक्षकासाठी द्रोणाचार्य पुरस्कार (सामान्य श्रेणी)
- जीवनज्योत सिंग तेजा – तीरंदाजी
- मुहम्मद अली कमर – बॉक्सिंग
- सुमा सिद्धार्थ शिरूर – शूटिंग
- सुजित मान – कुस्ती
प्रशिक्षकासाठी आजीवन श्रेणी
- दिनेश जवाहर लाड – क्रिकेट
- बिमल प्रफुल्ल घोष – फुटबॉल
- राजसिंग – कुस्ती
क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2022
श्रेणी संस्था
- तरुण खेळाडूंना ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ट्रांसस्टाडिया इंटरप्राइजेज
- खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी
- विकासासाठी खेळ लडाख स्की आणि स्नोबोर्ड असोसिएशन
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी उल्लेखनीय खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात.
मागील चार वर्षांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूने क्रीडा क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ दिला जातो.
मागील चार वर्षांच्या कालावधीतील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि शिस्तीची भावना दर्शविल्याबद्दल.‘क्रीडा आणि क्रीडा स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार’ दिला जातो.
सातत्यपूर्ण आधारावर उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कार्य केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षित करून सक्षम केल्याबद्दल ‘क्रीडा आणि क्रीडा स्पर्धांमधील उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार’ प्रशिक्षकांना दिला जातो
ज्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने क्रीडा क्षेत्रात योगदान दिले आहे आणि निवृत्तीनंतरही क्रीडा स्पर्धांच्या प्रचारात सातत्याने योगदान देणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी ‘क्रीडा आणि क्रीडा स्पर्धांमधील कामगिरीसाठी ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ दिला जातो.
ज्यांनी क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे, अशा कॉर्पोरेट संस्था (खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही), क्रीडा नियंत्रण मंडळे, स्वयंसेवी संस्था, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’दिला जातो.
आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये एकूण सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (एमएकेए)चषक दिला जातो.
यावर्षी, प्रथमच या पुरस्कारांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आणि समर्पित पोर्टलद्वारे स्वयं -अर्ज करण्याची परवानगी खेळाडू/प्रशिक्षक/संस्था यांना देण्यात आली.यावर्षी या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात नामांकने प्राप्त झाली . सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील आणि प्रख्यात खेळाडू, क्रीडा पत्रकारितेचा अनुभव असलेल्या व्यक्ती आणि क्रीडा प्रशासक यांचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या निवड समितीने या नामांकन अर्जांवर विचार केला.










































































