Last Updated on 08 Oct 2022 6:30 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । संपकाळात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते,त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती,या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत.एसटी महामंडळासह झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय आला.
परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज पार पडली.त्यात हा निर्णय घेण्यात आला.
संपावर असलेल्या आणि पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढलेल्या आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या सुमारे 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते.संपकाळात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी निलंबित-बडतर्फ झाले होते,त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या 118 कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती,
पगारवाढ आणि एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण यासह इतर मागण्यांसाठी एमएसआरटीसीचे कर्मचारी जवळपास सहा महिन्यांपासून संपावर गेले होते.त्यानंतर संप मिटवण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी वाटाघाटी झाल्या. मात्र, त्यानंतरही संप सुरूच होता. अशात एमएसआरटीसीच्या काही कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप आहे.त्यानंतर लगेचच माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याची घोषणा केली होती.त्यानंतर,आता या बडतर्फ करण्यात आलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.










































































