Last Updated on 25 Feb 2023 9:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अंतर्गत राज्य शासनाच्या विविध विभागांमधील वेगवेगळ्या संवर्गाच्या एकूण 673 पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
mpsc.gov.in/downloadFile/e
महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यांमध्ये 4 जून रोजी परीक्षा होणार आहे.यामध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये 295 पदे, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात 130 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागात 15 पदे, अन्न व नागरी विभागात 39 पदे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात 194 पदांकरीता परीक्षा होणार आहे.
परीक्षेचा तपशील
राज्यसेवा मुख्य परीक्षा 7,8 आणि 9 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ, ब मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी होईल. तसेच निरीक्षक वैधमापन शास्त्र गट-ब मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर रोजी होईल तर अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब मुख्य परीक्षा २28 ऑक्टोबर रोजी होईल.

आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली PDF जाहिरात अशी :









































































