Last Updated on 27 Jun 2022 11:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी (MHT CET 2022) अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा (एडिट) करण्यासाठी संधी दिली आहे.त्यानुसार विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे.
उच्च शिक्षणाच्या ‘सीईटी’साठीही सुविधा
उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लॉ (5 वर्षे), बीपीएड, एमएड, बीएड-एमएड, लॉ (3 वर्षे), बीए-बीएड, बीएस्सी बीएड या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज 29 जूनपर्यंत एडिट करता येणार आहे. बीएड, एमपीएड अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी 8 ते 11 जुलै या कालावधीत अर्ज एडिट करण्याची संधी उपलब्ध होईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले.
डेटशीट लवकरच प्रसिद्ध होईल
MHT CET अर्थात महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट 2022 ची डेटशीट लवकरच अधिकृत वेबसाइट – mahacet.org, cetcell.mahacet.org वर प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र सीईटी सेलने जारी केलेल्या सूचनेनुसार, पीसीएम गटासाठी एमएचटी सीईटी 2022 परीक्षा 05 ते 11 ऑगस्ट 2022 दरम्यान, तर पीसीबी गटाची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान होण्याची शक्यता आहे.
MHT CET 2022 : अर्ज असा दुरुस्त करायचा
सर्वप्रथम mahacet.org किंवा cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर होम पेजवर ‘MHT-CET 2022’ लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
तुमची क्रेडेन्शियल्स वापरून येथे लॉग इन करा.
आता तुमचे फॉर्म संपादित करा आणि आवश्यक बदल करा आणि सबमिट करा.
आता तुमचा सुधारित फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.











































































