Last Updated on 12 Jun 2023 10:16 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षा 2023 चा निकाल 12 जून रोजी जाहीर होणार आहे. अभियांत्रिकी (इंजिनिअरींग) आणि औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल,12 जून रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
पीसीएम (फिजीक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) या ग्रुपसाठी परीक्षा 9 ते 14 मे दरम्यान घेण्यात ली होती. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) या ग्रुपसाठी परीक्षा 15 ते 20 मे दरम्यान झाली होती. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. परीक्षा जवळपास 4.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.
असा पाहा MHT CET 2023 निकाल?
- निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या
- cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर portal links यावर क्लिक करा
- त्यानंतर Check MHT CET Result 2023 या लिंकवर क्लिक करा
- रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा
- रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा






































































