Last Updated on 13 Jan 2026 10:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या MAHATET 2025 (शिक्षक पात्रता परीक्षा) संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. परीक्षेची अंतिम उत्तरसूची (Final Answer Key) आता परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, यानुसारच आता निकाल जाहीर केला जाणार आहे.
आक्षेप आणि प्रक्रियेनंतर अंतिम निर्णय
२३ नोव्हेंबर रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील प्रश्नांबाबत किंवा उत्तरांबाबत उमेदवारांना २७ डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याची मुदत देण्यात आली होती. प्राप्त झालेल्या सर्व लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेतल्यानंतर, आता ही अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.













































































