Last Updated on 11 Mar 2026 8:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारात पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता नागरिकांना प्रशासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज नसून, प्रशासनच लोकांच्या भेटीला येत आहे, ही बाब अत्यंत समाधानकारक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग आणि वाळवा-ईश्वरपूर तहसील कार्यालय यांच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा’ (टप्पा १) शुभारंभ बहे (ता. वाळवा) येथे आ. खोत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. अप्पर जिलाधिकारी सुशांत खांडेकर, सहआयुक्त संतोष भोर, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सारिका रासकर, तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महिन्यातून एकदा शिबिराचे आयोजन व्हावे
आ. खोत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात हे जनहितार्थ अभियान राबवले जात आहे. असा उपक्रम प्रत्येक तालुक्यात महिन्यातून किमान एकदा राबवून त्याची प्रभावी सुरुवात वाळवा तालुक्यातून व्हावी.
या शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती, अर्जांची स्वीकृती आणि महसुली प्रकरणांचे जागेवरच निवारण करण्यात आले.
राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक अविनाश खरात, पं.स. सदस्य मनोज पाटील, सरपंच संतोष दमामे, शिरटेचे सरपंच राजेंद्र लाड,उपसरपंच पृथ्वीराज पाटील, हुबालवाडीच्या सरपंच मंगल हुबाले, कोळेचे उपसरपंच इंद्रजित पाटील, शिवाजीराव पाटील, हणमंतराव पाटील तसेच नायब तहसीलदार दगडू उगळे, प्रवीण कोटकर, प्रज्ञा कांबळे, पुरवठा निरीक्षक अविनाश मोरे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार सारिका रासकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नायब प्रवीण कोटकर यांनी आभार मानले. मंडळ अधिकारी उषा गवळे. ग्राम महसूल अधिकारी गणेश हुबाले(बहे), लाहुदास चौधरी (कोळे), विशाल कदम (तांबवे), विष्णू गुरव (हुबालवाडी), सोनाली चव्हाण (शिरटे) आदींनी संयोजन केले.
हेडींगमध्ये सदाभाऊ खोत यांचे भाषण यावे










































































