Last Updated on 24 Feb 2026 5:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. लवकरच सर्व महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे ही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे.
दरम्यान, जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी रोजी महिला आणि बालविकास विभागाकडे तब्बल ९८ कोटी रुपये जमा केले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते जमा करण्यात आले. जानेवारीचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
फेब्रुवारी महिना संपत आला आहे. केवळ ४ दिवस शिल्लक आहेत. मात्र या महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जाईल याविषयी राज्य सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.












































































