Last Updated on 30 Jan 2026 9:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
कुरळप व परिसरात पैशाच्या जोरावर राजकारण करण्याचा उद्योग बळावत चालला आहे. आपले गांव,आपली युवा पिढी वाचविण्यासाठी ही प्रवृत्ती वेळीच रोखायला हवी,अशी अपेक्षा माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी कुरळप व चिकुर्डे येथील प्रचार सभेत बोलताना व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून चिकुर्डे जिल्हा परिषदेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेस दिलेली आहे. आपण सर्वांनी एकसंघ पणे अभिजित पाटील यांच्यासह तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करा,असे आवाहनही त्यांनी केले.
कुरळप व चिकुर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या चिकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अभिजीत पाटील,पंचायत समितीचे उमेदवार प्रकाश रघुनाथ पाटील, कुरळप पंचायत समितीचे उमेदवार शशिकांत वायदंडे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. माजी आम. मानसिंगभाऊ नाईक,राज्य साखर संघांचे अध्यक्ष पी.आर.पाटील (दादा),बाळासाहेब पाटील, माजी जि.प.सदस्य संजीव पाटील,राजारामबापू दूध संघाच्या उपाध्यक्ष शशिकांत पाटील,संचालक विलासराव पाटील,सुभाषराव पाटील,अश्विन पाटील,चिकुर्डेचे सरपंच रणजीत पाटील, श्रीनिवास डोईजड,रावसाहेब भोसले,दिलीपराव खांबे,चांदसो तांबोळी प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. पाटील पुढे म्हणाले, कोणाकडे कशातून पैसा येत आहे आणि या पैशाच्या जोरावर कसा खेळ चालू आहे, हे या भागातील सुज्ञ जनता पहात आहे. मात्र या निवडणुकीत या मतदार संघातील स्वाभिमानी जनता हा पैशाचा खेळ निश्चित बंद करेल. यापूर्वी आपण अभिजित पाटील यांच्या विरोधात निवडणुका लढविल्या आहेत,जोराची भाषणे केली आहेत. मात्र या निवडणुकीत अभिजित पाटील यांना विजयाचा गुलाल लावल्याशिवाय थांबणार नाही.
मानसिंग नाईक म्हणाले, पी.आर दादांनी कुरळप गावातील युवकांना जिह्यात सर्वाधिक नोकऱ्या देत हे गांव उभा केले आहे. मात्र सध्या गावात काय अवस्था आहे.? दादांनी गावाच्या, भागाच्या विकासाला पुढे नेण्यासाठी संघर्ष बाजूला ठेवत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
अभिजित पाटील म्हणाले,आमचा कोणा व्यक्तीला विरोध नाही,मात्र युवा पिढी बरबाद करण्याचा,गावांची संस्कृती बिघडविण्याच्या विरोधात आम्ही आहोत.
यावेळी उमेदवार शशिकांत वायदंडे, प्रकाश पाटील, संजीव पाटील, विलासराव पाटील, सुभाष तात्या पाटील, चांदसो तांबोळी, नामदेव देवकर, प्रताप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कुरळप येथे संचालक दीपक पाटील, जोतिराम माळी,इकबाल जमादार, डी.एल.पाटील, माणिक पवार, वसंतराव यादव, नागेश जाधव, सतीश पाटील, चिकुर्डे येथे यशवंत ग्लुकोजचे संचालक युवराज यादव, शहाजी पाटील, सुरेंद्र पाटील, उत्तम पाटील, शामराव पाटील, प्रकाश कांबळे, कृष्णात पवार, बाबासाहेब खोत यांच्यासह कुरळप व चिकुर्डे गावातील पदाधिकारी,कार्यकर्ते, युवक व स्त्री – पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































