Last Updated on 28 Feb 2026 3:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
बोरगाव (ता. वाळवा) येथील नूतन जिल्हा परिषद सदस्या म्हणून कांताताई शिवाजीराव वाटेगावकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राजू शेट्टी म्हणाले, अन्याविरुद्ध लढणाऱ्या बापू बिरु वाटेगावकर यांची सून जिल्हा परिषदेत सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवतील यात मला शंका नाही.
यावेळी कांताताई वाटेगावकर म्हणाल्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नाबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवू . यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, शिवाजीराव वाटेगावकर, उपसरपंच राजेंद्र वाटेगावकर, भास्कर कदम, शिवाजी पाटील, शहाजी पाटील, अशोक सलगर, प्रताप पाटील, संदीप वास्के, बाळासाहेब वाटेगावकर, प्रकाश देसाई, रामचंद्र वाटेगावकर, प्रदीप पाटील, अजित वाटेगावकर, प्रदीप नांगरे उपस्थित होते.












































































