Last Updated on 22 Mar 2026 6:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
शहरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करीत शहरातील नशेच्या गोळ्या विकणारी केंद्रे उध्वस्त करण्यासंदर्भात माझी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील, असा विश्वास माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी उरुण ईश्वरपूर येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. सध्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. मात्र त्यातून निश्चित मार्ग काढू,काळजी करु नका,असा दिलासाही त्यांनी नागरिकांना दिला.
येथील मनसेच्या महिला शहराध्यक्षा सौ.करिष्मा स्वप्नील जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा आ.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे,उप नगराध्यक्ष खंडेराव जाधव,शहराध्यक्ष शहाजी पाटील,महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, पाणीपुरवठा समितीचे सभापती एल.एन. शहा, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी,माजी उप नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण,कृष्णेचे संचालक संजय पाटील,’राजारामबापू’चे संचालक अतुल पाटील,बूथ अध्यक्ष राजेंद्र बाणेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील पुढे म्हणाले,वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या गळतीबरोबर ज्यांच्या हाती सत्ता होती,त्यांनी नवीन पाणी योजनेबाबत फारसे काही केले नाही. मात्र मध्यंतरी नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव दिला आहे,त्याचा राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि पाणीपुरवठा मंत्र्यांच्या कडे पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान आहे त्या, योजनेतून अद्यावत तंत्रज्ञानाच्या आधारे गळती रोखने आणि पाणी पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही लवकर प्रभाग बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहोत.
सौ.करिष्मा जाधव म्हणाल्या,आ.जयंतराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेवून. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षात मला सक्षम व्यासपीठ मिळेल, सर्वसामान्य जनतेची, आणि महिलांची सेवा करण्याची संधी मिळेल.
आनंदराव मलगुंडे म्हणाले,येत्या काही दिवसात शहरात १२ कोटी रुपयांची रस्ते, गटारी ची कामे सुरु करत आहोत. तुम्हाला विश्वासात घेऊन पुन्हा शहराचा विकास गतिमान करु.
खंडेराव जाधव म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांनी गेल्या तीन महिन्यात ३-४ बैठका घेऊन शहराच्या विकासाबद्दल सूचना केल्या आहेत. शहराच्या विकासाला निधी कमी पडणार नाही, त्याबद्दल कोणतीही चिंता नका.
शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, आमचा पक्ष आणि नेतृत्व हे महिलांना संधी आणि सन्मान देणारा आहे. करिष्मा जाधव यांनाही निश्चित संधी व सन्मान दिला जाईल. पाणी पुरवठा सभापती एल.एन.शहा यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी महिला शहराध्यक्षा सौ.पुष्पलता खरात यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक पांडुरंग बाणेकर,उषाताई बाणेकर,धनंजय कुलकर्णी,नगरसेवक डॉ.संग्राम पाटील,सुनिल मलगुंडे,सचिन कोळी,स्वरूप मोरे,महेश पाटील, अरुण शिंगण,निवास पाटील,दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर,अभिमन्यू क्षीरसागर,विशाल सूर्यवंशी,परेश पाटील,राजू अडसूळ,विजय देसाई, रविंद्र वाघमोडे,सागर जाधव,फिरोज खान,मनिषा पेठकर,प्रियांका साळुंखे,माया जाधव,हिंदुराव माळी,संजय रानमाळे यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बूथ अध्यक्ष राजेंद्र बाणेकर यांनी आभार मानले. नितीन वायदंडे यांनी सूत्रसंचालन केले.










































































