Last Updated on 04 Mar 2026 5:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आ. जयंत पाटील यांनी आज विधानसभेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नांवर लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून भाष्य केले.
जयंत पाटील म्हणाले की, अफगाणिस्तान मधून येणाऱ्या मालावर बंदी घालण्यासाठी काय करता येईल या संदर्भात मी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी सात – आठ महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. त्यावर काही कारवाई झालेली नाही. चीनच्या अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या मालावर बंदी आणण्यासाठी केंद्रीय स्तरावर निर्णय होणं आवश्यक आहे. त्यासाठी मंत्री पुढाकार घेणार का? असा प्रश्न विचारत असतानाच ते म्हणाले की, आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्ड स्टोरेज फुल झाली आहेत. द्राक्ष काही बाहेर जात नाहीत. त्यामुळे कोल्ड स्टोरेज पर्यायाने कंटेनर कुलिंगचा खर्च आता वाढणार आहे. अशा परिस्थितीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना युद्धजन्य परिस्थितीसाठी सरकार विशेष अनुदान देणार का? असा सवालही त्यांनी सरकारला केला.












































































