Last Updated on 14 Mar 2026 9:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कृष्णा हॉस्पिटलचे सहकार्य, महिला राष्ट्रवादी काँग्रेस व जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचा पुढाकार
ईश्वरपूर ।
उरुण ईश्वरपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने कृष्णा विश्व विद्यापीठ हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कराड यांच्या सहकार्याने कापुसखेड नाका येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्रात आयोजित आरोग्य शिबिराचा ४८० रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात महिलांची मेमोग्राफी व कॅल्शियम तपासणी करण्यात आली. माजी मंत्री आ. जयंत पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबीर पार पडले.
लोकनेते राजारामबापू पाटील, श्रीमती कुसुमताई पाटील, सहकार महर्षी स्व.जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमा पूजनाने शिबिराची सुरुवात करण्यात आली.
या शिबिरात ३८० महिलांची, तर १०० पुरुषांच्या विविध तपासण्या करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी रक्त, लघवी, रक्तदाब आणि ईसीजीही घेण्यात आला. तसेच रक्तवाढीच्या व कॅल्शियमच्या ५० दिवसाच्या गोळ्या, जंताची गोळी मोफत देण्यात आली. कृष्णा हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. यातील आवश्यक रुग्णांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे पुढील उपचार केले जाणार आहेत.
नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, प्रा.शामराव पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, प्राचार्य आर.डी.सावंत, डॉ.नरसिंह देशमुख, नगरसेवक एल.एन.शहा, डॉ.संग्राम पाटील, संदीप माने, सुनिल मलगुंडे, संग्राम पाटील, सचिन कोळी, शिवानी जाधव, महिला बालकल्याण सभापती सुप्रिया पाटील, नगरसेविका कांचन कोळेकर, सविता आवटी, मनीषा कुरळपकर, रेखा जाधव, पल्लवी नागे, संध्या कांबळे, जावेद मोमीन, सचिन हांडे, स्वरूप मोरे, युवक अध्यक्ष दिग्विजय पाटील, अभिमन्यू क्षीरसागर, अभिजीत कुर्लेकर, राहुल नागे, प्राचार्य एन.आर. मुजावर, अभियानचे संघटक ईलियास पिरजादे यांच्यासह नगरसेवक,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, रोझा किणीकर, मनिषा पेठकर, योगिता माळी, संगिता शहा, सुप्रिया पेठकर, सुनंदा साठे, मंगल आनंदराव मलगुंडे, लता सुनिल मलगुंडे, गौरी व्यास, पंचफुला जाधव, सुहासिनी जंगम यांच्यासह महिला कार्यकर्त्या व जयंत दारिद्र्य निर्मूलनच्या संघटकांनी शिबिराचे नियोजन केले.












































































