Last Updated on 10 Jan 2026 3:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
उरुण ईश्वरपूर येथील भोसले पाटील परिवारातील व उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संभाजीराव शिवाजीराव पाटील (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. तहसिलदार सौ.सुजाता सुनिल पवार व इंजि.सुजीत व इंजि.शिवराज पाटील यांचे ते वडील होते. रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता उरुण- ईश्वरपूर येथे होणार आहे.












































































