Last Updated on 21 Jan 2022 11:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
लाभार्थ्यांसाठी को-विन (Co-WIN ) ची विविध उपयुक्तता वैशिष्ठ्ये अद्ययावत ठेवण्यासाठी, CoWIN च्या स्व-नोंदणी पोर्टलमध्ये खालील वैशिष्ठ्ये जोडली गेली आहेत.
अ) Co-WIN वर नोंदणी – 4 सदस्यांच्या विद्यमान मर्यादेऐवजी, आता 6 सदस्यांना Co-WIN वर एका मोबाईल क्रमांकाचा वापर करून नोंदणी करता येईल.
ब ) लसीकरण स्थितीत बदल – Co-WIN खात्यात ‘रेझ अँन इशू’ अंतर्गत एक नवीन उपयुक्तता वैशिष्ठय जोडले गेले आहे, ज्याद्वारे लाभार्थी त्याची वर्तमान लसीकरण स्थिती (vaccination status) पूर्ण लसीकरणापासून अंशत: लसीकरण किंवा लसीकरण झालेले नाही, या स्थितीपर्यंत आणि अंशतः लसीकरण ते लसीकरण झालेले नाही, या स्थितीतही मागे घेऊ शकतो.
लाभार्थ्यांच्या लसीकरण डेटाच्या अद्ययावतीकरणात लसीकरणकर्त्याद्वारे अनावधानाने डेटा एन्ट्री त्रुटींमुळे निर्मित लसीकरण प्रमाणपत्रांच्या तुरळक प्रकरणांमध्ये लसीकरणाची स्थिती लाभार्थींद्वारे दुरुस्त केली जाऊ शकते. ‘रेझ अँन इशू’ युटिलिटीद्वारे ऑनलाइन विनंती सादर केल्यानंतर बदल होण्यासाठी 3-7 दिवस लागू शकतील.अशा लाभार्थ्यांना लसीची देय मात्रा मिळू शकते. सध्याच्या प्रमाणित मार्गदर्शक सूचनांनुसार प्रणालीमध्ये नवी लसीकरण स्थिती यशस्वीरीत्या अद्ययावत झाल्यानंतर जवळच्या लसीकरण केंद्रात लसीची मात्रा घेता येऊ शकेल.
को-विन पोर्टलवरून कोणतीही माहिती फुटलेली नाही,को-विनवर संग्रहित संपूर्ण माहिती या डिजिटल मंचावर सुरक्षित
नवी दिल्ली |
को-विन पोर्टलमध्ये संग्रहित माहिती ऑनलाइन फुटल्याचा झाल्याचा दावा करणारी अनेक वृत्त माध्यमांनी दिली आहेत.
Co-WIN पोर्टलवरून कोणतीही माहिती फुटलेली नाही आणि त्यावरील व्यक्तींची संपूर्ण माहिती या डिजिटल मंचावर सुरक्षित आणि संरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या वृत्ताच्या वस्तुस्थितीबाबत चौकशी करेल, हेदेखील स्पष्ट करण्यात येत आहे. परंतु प्रथमदर्शनी माध्यमातील दावा बरोबर नाही, कारण को-विन कुठल्याही व्यक्तीचा पत्ता किंवा कोविड लसीकरणासाठी RT-PCR चाचणी निकाल संकलित करत नाही.










































































